शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, आता मागेल त्याला योजना, प्रत्येक शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार, अर्ज प्रक्रिया | Magel Tyala Yojana

शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र कृषी विभागाच्या अंतर्गत मागेल त्याला योजना हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मागेल त्याला योजना अंतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्याला विविध योजनांचा लाभ मिळवता येणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला असून या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे, या Magel Tyala Yojana ची संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

खालील योजनांचा समावेश मागेल त्याला योजना अंतर्गत मध्ये करण्यात आला List of Magel Tyala Yojana

राज्याच्या कृषी विभागाने खालील विविध योजनांचा समावेश मागेल त्याला योजना अंतर्गत मध्ये केलेला असून त्यामुळे आता शेतकरी खालील योजना अंतर्गत सहज लाभ मिळवू शकतात.

1. शेततळे योजना

2. फळबाग लागवड योजना

3. प्लास्टिक अस्तरीकरण योजना

4. कॉटन श्रेडर योजना

5. बीबीएफ पेरणी यंत्र

6. ठिबक तसेच तुषार सिंचन योजना

अशा प्रकारच्या विविध योजनांचा समावेश आता मागेल त्याला योजने अंतर्गत करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना सहजतेने वरील विविध योजनांचा लाभ मिळवता येणार आहे. वरील सर्व महत्वपूर्ण अशा Magel Tyala Yojana Maharashtra असून वेळोवेळी शेतकऱ्यांकडून वरील योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी करण्यात येते त्यामुळे आता शेतकऱ्यांना वरील योजनांचा सहज व लवकर लाभ मिळता येणार आहे.

 

मागेल त्याला योजना शासन निर्णय निर्गमित Magel Tyala Yojana GR

शेतकरी बांधवांनो राज्यात वरील सर्व योजना मागील त्याला योजना या घटकांतर्गत राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला असून त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना सुद्धा जाहीर केलेल्या आहेत. हा महत्वपूर्ण जीआर महाराष्ट्र शासनाने 25 एप्रिल 2023 रोजी प्रकाशित केलेला आहे.

 

Ration Card: महत्वाची बातमी, आता फक्त याच रेशन कार्ड धारकांना मिळणार ‘फ्री’ रेशन धान्य, तुम्हाला मिळणार का?

 

योजनेची अंमलबजावणी:

मागेल त्याला योजना या घटकांतर्गत वरील सर्व योजना महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणार असून सन 2023 24 या आर्थिक वर्षामध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याची कार्यवाही महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाईन करण्यात येणार आहे.

वरील योजनांच्या अनुदान संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात संदर्भात जमा करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळवलेल्या नसावा. योजनेच्या अंमलबजावणी करिता आवश्यक असणारा निधी हा सन 2023 व 24 आर्थिक वर्षाकरिता प्रचलित योजनेमधून उपलब्ध करून देण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहे.

 

आता शेतकऱ्यांना मोफत बियाणे व औषधी वाटप होणार! शासन निर्णय जाहीर, श्री अन्न अभियान सुरू

 

या योजनांची अंमलबजावणी सन 2023 24 या वर्षांमधून होणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment