महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदांकरिता बंपर भरती सुरू, आत्ताच ऑनलाईन अर्ज सादर करा | Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागात वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या पदांच्या विविध रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वरील सर्व पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. भरती प्रक्रिया अंतर्गत 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागात नोकरी करण्याची ही एक चांगली संधी निर्माण झालेली असून Krushi Vibhag Maharashtra Bharti प्रक्रियेच्या संपूर्ण तपशील खालील प्रमाणे आहे.

 

महाराष्ट्र कृषी विभाग भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील त्यामध्ये भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात तसेच पदांचा तपशील तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख व इतर सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा आहे लिहून दिलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या Krushi Vibhag Bharti 2023 Maharashtra प्रक्रिया अंतर्गत केवळ एकच परीक्षा होणार आहे. त्यानंतर कट ऑफ नुसार लिस्ट जाहीर करून उमेदवारांची निवड होईल.

 

 

कृषी विभाग महाराष्ट्र भरती 2023 तपशील Krushi Vibhag Maharashtra Recruitment

एकूण रिक्त जागा: 218 (158+60)

पदांचे नाव आणि पदसंख्या:

1. वरिष्ठ लिपिक- 105 जागा

2. सहाय्यक अधीक्षक- 53 जागा

एकूण: 158 जागा

1. लघुटंकलेखक- 28 जागा

2. लघुलेखक (निम्न श्रेणी)- 29 जागा

3. लघुलेखक (उच्च श्रेणी)- 3 जागा

एकूण: 60 जागा

जागा: विभाग निहाय रिक्त जागा उपलब्ध जाहिरात पहावी

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: 720 रु, आरक्षित प्रवर्ग, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ – 650 रु

शैक्षणिक पात्रता: पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक (शैक्षणिक पात्रतेच्या माहितीकरिता अधिकृत जाहिरात पहा)

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षे सूट)

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 एप्रिल 2023

जाहिरात (Notification): येथे पहा

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे करा

अधिकृत वेबसाईट: येथे पहा

 

 

कृषी विभाग महाराष्ट्र भरती अंतर्गत अर्ज कसा करायचा? How to Apply For Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023?

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वरील पदांच्या भरती अंतर्गत सदर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून सर्वात पहिल्यांदा जाहिरात डाऊनलोड करून संपूर्ण वाचायची आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती तसेच शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा व इतर सर्व माहिती वाचून https://ibpsonline.ibps.in/campmar23/ या वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो तसेच स्वतःची सही तसेच डाव्या हाताच्या अंगठ्याचा थंब इम्प्रेशन ऑनलाइन अपलोड करावा लागेल.

 

कृषी विभाग महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया, पात्रता ; येथे पहा

 

उमेदवारांकरिता महत्त्वपूर्ण सूचना:

1. Krushi Vibhag Bharti Maharashtra 2023 अंतर्गत केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

2. पोस्टाच्या माध्यमातून किंवा ऑफलाइन इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

3. उमेदवारांनी अर्जाची फी पेड केल्याशिवाय त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

4. अर्ज करणाऱ्या सदर उमेदवारांनी 20 एप्रिल 2023 पूर्वी त्यांचा ऑनलाईन अर्ज सादर करावा.

5. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ वाचून घ्यावी.

 

CMEGP: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 12 हजार पेक्षा जास्त उद्योगांना कर्ज मंजूर, 10 ते 25 लाख अर्थसहाय्य मिळवण्यासाठी असा करा अर्ज

Leave a Comment