IMD Mansoon Andaj: भारतीय हवामान विभागाचा 2023 करिता मान्सून अंदाज जाहीर; या पावसाळ्यात कसा पडेल पाऊस, 2023 पावसाळ्याचा अंदाज

देशातील भारतीय हवामान विभागाने सन 2023 करिता चा मान्सून हवामान पूर्वानुमान जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता 2023 करिता पावसाळा कसा राहील? 2023 च्या पावसाळ्यामध्ये कोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस पडणार याचा अचूक अंदाज आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे या लेखात आपण भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या 2023 चा मान्सून म्हणजेच IMD Mansoon Andaj पावसाळ्याचा अंदाज आपण जाणून घेणार आहोत.

 

शेतकरी बांधवांनो यापूर्वी आपण देशातील खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट कंपनीचा अंदाज जाणून घेतला होता. स्कायमेट या खाजगी कंपनीच्या मान्सून अंदाजानुसार सन 2023 मध्ये पावसाळ्यात राज्यातील काही भागात पावसाचा खंड असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. त्यामुळे राज्याचे शेतकरी चिंतेत पडले होते आणि आता एवढ्यातच भारतीय हवामान विभागाचा Mansoon Andaj येईल यापेक्षा शेतकरी भारतीय हवामान विभागाच्या खात्रीशीर नव्या अंदाजाची वाट पाहत होते.

 

त्यामुळे आता भारतीय हवामान विभागाने सन 2023 करिता मान्सून म्हणजेच पावसाळ्याचा अंदाज जाहीर केलेला असून ते खालील प्रमाणे आहे.

 

 

भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार मान्सून कसा राहील? Mansoon Forcast 2023

भारतीय हवामान विभागाने 12 एप्रिल 2023 रोजी जाहीर केलेल्या पूर्वानुमानानुसार मान्सून 2023 हा 96 टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे देशात या पावसाळ्यात 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने दर्शविलेल्या अंदाजामध्ये (+-) 5 टक्के ची तफावत असू शकते. देशात 850 मिलिमीटर च्या आसपास यावर्षी पाऊस राहू शकतो.

ला निना ची स्थिती न्यूट्रल झालेली आहे. राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत अल निनो चा प्रादुर्भाव दिसू शकतो.

 

सरासरी पेक्षा कमी पाऊस- 22% शक्यता

सामान्य पेक्षा कमी पाऊस- 29% शक्यता

सामान्य मानसून- 35% शक्यता

सामान्य पेक्षा जास्त पाऊस- 11% शक्यता

अत्याधिक पाऊस- 3 % शक्यता

वरील सर्व अंदाजावरून देशात सामान्य किंवा सामान्य पेक्षा कमी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे.

 

राज्यातील या भागात सामान्य मानसून राहण्याची शक्यता:

आपल्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजी नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, परभणी, नाशिक जिल्ह्याचा काही भाग तसेच पुणे जिल्ह्याचा काही भाग, सांगली, सातारा तसेच सोलापूरचा काही भाग, यवतमाळ तसेच नांदेड व लातूर यांचा काही भाग या भागात सामान्य पाऊस राहण्याची शक्यता आहे.

 

अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या 23 जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांसाठी 177 कोटी वितरित; शासन निर्णय आल; आत्ताच यादीत नाव पहा

 

अशाप्रकारे भारतीय हवामान विभागाने 2023 चा Mansson पूर्वानुमान जाहीर केलेला आहे. अजूनही पुढे मान्सूनचा शंभर टक्के अचूक अंदाज देणारा भारतीय हवामान विभागाचा अंदाज घेणार आहे.

 

हे नक्की पहा :Kharip Pik Vima Update: खरीप पीक विमा 2022-23 चे उर्वरित पैसे वाटप सुरू; या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा 

Leave a Comment