शेतकरी बांधवांनो ट्रॅक्टर योजने अंतर्गत नवीन अर्ज सुरू; ट्रॅक्टर योजनेचा 44 कोटी रुपयाचा निधी वितरित; असा करा लगेच ऑनलाईन अर्ज | Tractor Yojana 2023 Maharashtra

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर विविध प्रकारच्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजना सुरू आहेत. महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिकीकरणाकडे वळवण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाडीबीटी पोर्टलवर राबवित आहे. राज्य पुरस्कृत असणाऱ्या या कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा Tractor Yojana 2023 हा ट्रॅक्टर अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येतो.

 

नुकताच महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर योजने संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून 44 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे. तसेच नवीन अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देखील जाहीर झालेले आहे. ट्रॅक्टर योजने करिता महाराष्ट्र शासनाने जास्तीत जास्त लक्षांक ठेवलेला असून अनेक लाभार्थ्यांना ट्रॅक्टर मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अनुदानावर ट्रॅक्टर हवा आहे अशा शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर Krushi Yantrikaran Yojana या घटकांतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

 

ट्रॅक्टर योजने करिता अर्ज कसा करायचा? How to Apply For Tractor Yojana?

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या Krushi Yantrikaran या घटकांतर्गत ट्रॅक्टर योजने करिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. Tractor Yojana करिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये महाडीबीटी शेतकरी योजना ची वेबसाईट ओपन करा.

2. https://mahadbt.maharashtra.gov.in/ ही ट्रॅक्टर योजने करिता अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट आहे.

3. आता सर्वात पहिल्यांदा या विषयाच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तुमची नोंदणी करायची आहे.

4. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि ओटीपी च्या माध्यमातून किंवा तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.

5. आता या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर आल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा नावाचा एक पर्याय दिसेल.

6. अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.

7. आता तुमच्यासमोर विविध प्रकारच्या बाबी ओपन झालेले आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या योजना करता तुम्हाला वेगवेगळी बाब निवडून अर्ज करता येतो.

8. ट्रॅक्टर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या बाबीवर क्लिक करा.

9. आता तुमच्यासमोर ट्रॅक्टर योजने करिता अर्ज करण्याचा फॉर्म ओपन झालेला आहे, त्यामध्ये सुरुवातीला घटक निवडा या पर्यायावर क्लिक करून कृषी यंत्र अवजाराचे खरेदी हा पर्याय निवडा.

10. त्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

11. त्यानंतर जास्त असू शकते चा ट्रॅक्टर मिळवण्यासाठी फोर व्हील ड्राईव्ह या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ट्रॅक्टरची एचपी श्रेणी निवडा.

12. आता तुम्हाला सर्व बाबी निवडल्यानंतर तुमचा अर्ज जतन करायचा आहे.

13. आता तुम्हाला पुन्हा या वेबसाईटच्या होम पेजवर येऊन अर्ज सादर करा या पर्यावर क्लिक करून अर्ज सादर करायच्या पर्यावर क्लिक करून पेमेंट करून तुमचा अर्ज यशस्वीपणे सादर करा.

 

वरील प्रमाणे तुम्ही Tractor Subsidy Scheme Maharashtra करिता अगदी सहजतेने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

 

ट्रॅक्टर योजने करिता आवश्यक कागदपत्रे येथे पहा

 

ट्रॅक्टरचा ऑनलाईन अर्ज केला! आता पुढील प्रक्रिया काय आहे?

शेतकरी बांधवांनो ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत तुम्ही सन 2022 ते 23 करिता नवीन ट्रॅक्टर करिता अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज छाननी अंतर्गत या घटकांमध्ये जातो. अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांची निवड ही ऑनलाईन सोडतीच्या माध्यमातून करण्यात येत असते. कृषी यांत्रिकीकरण योजनेची ऑनलाईन सोडत लागल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी कृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस प्राप्त होतो. आणि त्यांचा अर्ज छाननीअंतर्गत मधून तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्ज स्थितीमध्ये तुमच्या अर्जासमोर विनर हे नाव येते.

 

ट्रॅक्टर योजने करिता तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला सर्व योजना संदर्भातील कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागते. त्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता येतो. आणि ऑनलाईन पद्धतीने अनुदानाची मागणी करता येते.

 

ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

ट्रॅक्टर अनुदान बँक खात्यात जमा होते:

Tractor Anudan Yojana अंतर्गत अर्ज केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येते त्या शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत ट्रॅक्टरची खरेदी केल्यानंतर तसेच सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांचे आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यामध्ये Tractor Yojana अंतर्गत असणारे अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.

 

ट्रॅक्टर योजनेची लाभार्थी यादी येथे पहा

 

अशाप्रकारे आपल्याला ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान मिळवता येते.

Leave a Comment

error: Content is protected !!