ठिबक सिंचन योजना 2023 अर्ज कसा करायचा? ठिबक सिंचन बसवण्यासाठी 90 टक्के अनुदान | Thibak Sinchan Yojana Apply

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना राबविण्यात येत आहे. ठिबक सिंचन योजनेअंतर्गत 90 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येत असून ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन बसवायचे आहे अशा शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करायचे आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Thibak Sinchan Yojana अंतर्गत अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

ठिबक सिंचन योजना:

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या सर्व सोयी सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्या यासाठी ठिबक सिंचन योजना सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्ज एक योजना अनेक या महा डीबीटी शेतकरी पोर्टलवर ही योजना राबविण्यात येत आहे.

Thibak Sinchan Yojana अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहेत, असे शेतकरी अर्ज करू शकतात. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये ठिबक सिंचन संच बसवायचा असेल तर तुमच्या शेतात विहीर किंवा पाण्याचा कोणताही स्त्रोत असायला पाहिजे. तसेच त्याची नोंद तुमच्या सातबारावर असायला पाहिजे.

 

 

ठिबक सिंचन योजना आवश्यक कागदपत्रे Required Documents For Thibak Sinchan Yojana

1. अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड

2. बँक पासबुक

3. सातबारा व आठ अ

4. पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र

5. तलाठ्या कडील दाखला

6. पूर्व संमती पत्र

मित्रांनो जर तुम्हाला ठिबक सिंचन योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे वरील सर्व कागदपत्रे असायला पाहिजे.

 

 

ठिबक सिंचन योजने करिता असा करा अर्ज How to apply for Thibak Sinchan Yojana Maharashtra?

शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचन योजने करता जर तुम्ही अर्ज करणार असाल तर खालील प्रमाणे सविस्तर प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाची महाडीबीटी शेतकरी पोर्टलचे अधिकृत वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ओपन करा.

2. आता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

3. तुमचा आधार कार्ड नंबर आणि ओटीपी च्या साह्याने लॉगिन करा.

4. महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरून प्रोफाइल शंभर टक्के पूर्ण करायचे आहे.

5. आता तुम्हाला अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून ठिबक सिंचन हा पर्याय शोधायचा आहे.

6. आता तुमच्यासमोर ठिबक सिंचन योजनेचा ऑनलाईन अर्ज ओपन झालेला असेल.

7. त्यामध्ये तुम्हाला ठिबक सिंचन चा प्रकार तसेच ठिबक सिंचन ची साईज तसेच तुम्ही कोणत्या पिकाला ठिबक सिंचन बसवणार आहात, याची सर्व माहिती टाकून अर्ज सबमिट करायचा आहे.

8. अर्ज केल्याचा मोबाईल नंबर वर एसएमएस प्राप्त होईल तसेच त्यामध्ये अर्जाचा क्रमांक देखील असेल.

9. तुम्ही अर्ज केल्याची pdf फाईल तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवा किंवा त्याची प्रिंट काढा.

 

ठिबक सिंचन योजनेची मागील वर्षातील सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी येथे पहा

 

ठिबक सिंचन योजना लाभ वितरण प्रक्रिया

Thibak Sinchan Yojana अंतर्गत तुम्ही अर्ज केल्यानंतर ठिबक सिंचन योजने करिता तुमच्या तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून जेवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत. तेवढ्या सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. त्यानंतर ऑनलाईन सोडतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची निवड करून ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यात येतो. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतर ठिबक सिंचन खरेदी करायचे आहे. Thibak Sinchan Yojana 2023

 

Leave a Comment

error: Content is protected !!