शेतकऱ्यांना मिळत आहे लोखंडी तार कुंपणासाठी 90 टक्के अनुदान; शेताला करा लोखंडी तार कुंपण; असा करा अर्ज | Tar Kumpan Yojana

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या हितार्थ वेळोवेळी अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात येत असतात. अशाच प्रकारचा महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला असून आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला तार कुंपण करण्याकरिता 90 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासनाने लोखंडी तार कुंपणावरील अनुदानामध्ये वाढ करून ती आता 90 टक्के केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी ही तार कुंपण योजना काय आहे, या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा तसेच आवश्यक कागदपत्रे या Tar Kumpan Yojana Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

मित्रांनो लोखंडी तार कुंपण करण्यासाठी शासनाकडून अनुदान किती मिळणार तसेच उर्वरित अनुदान वगळता दहा टक्के रक्कम आपण स्वतः भरायची की बँकेकडून मिळवायची तसेच अर्ज कुठे आणि कसा करायचा या tar kumpan yojana संदर्भात माहिती या लेखात दिलेली आहे.

 

मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन जंगलाच्या काठाला आहे. अशा शेतकऱ्यांना तसेच त्यांच्या पिकांना जंगली प्राण्यांपासून मोठा धोका असतो. अनेक वेळा जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेले पीक संपूर्ण नष्ट करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेत जमिनीवर तसेच त्या पिकावर केलेला खर्च संपूर्णता वाया जातो आणि शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जंगलाकाठच्या शेतजमीन मालकांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत लोखंडी तार कुंपण करण्यासाठी अनुदान देण्यात येते.

 

मित्रांनो हा शेतकरी संपूर्ण जगाला अन्न पुरवतो. परंतु शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाच जर सुरक्षित राहत नसेल येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यामार्फत अन्नपुरवठा उपलब्ध न झाल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होऊ शकतात, म्हणून शेतकऱ्यांचे जंगली प्राण्या मार्फत कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी शासन शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला तार कुंपण करण्यासाठी अनुदान देते. मित्रांनो शेतकऱ्यांसाठी Tar Kumpan योजना ही वेळोवेळी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार व राज्य सरकारमधील पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येत असते.

 

तार कुंपण योजनेचे फायदे Benifits of Tar Kumpan Yojana

मित्रांनो शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लोखंडी तार कुंपण केल्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे फायदे होतात. लोखंडी तार कुंपनमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे खालील प्रमाणे आहे.

1. लोखंडी तार कुंपण केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सुरक्षित रित्या काम करता येते

2. आपल्या शेतातील शेतमालाचे रक्षण लोखंडी तार कुंपनामुळे होते

3. शेताला तार कुंपण केल्यास वन्य प्राण्यांबरोबरच पाळीव प्राण्यांचा देखील असणारा त्रास कमी होतो.

4. शासन तार कुंपण साठी अनुदान देते

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो लोखंडी तार कुंपण योजना अंतर्गत तुम्हाला अनुदानावर तुमच्या शेताला कुंपण करायचे असेल तर तुमच्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. अर्जदाराचे आधार कार्ड

2. अर्जदाराचा पत्त्याचा पुरावा

3. अर्जदाराची जमिनीशी संबंधित कागदपत्रे

4. अर्जदाराची बँक खाते

5. कास्ट सर्टिफिकेट

 

तार कुंपण योजना अंतर्गत अर्ज कसा करायचा ते येथे पहा

 

मित्रांनो वरील कागदपत्रे तुम्हाला या तार कुंपण योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आवश्यक आहेत. मित्रांनो बऱ्याच वेळा ही योजना जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती यांच्यामार्फत सुद्धा राबविण्यात येते त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन या योजनेची चौकशी करावी लागते. जर योजना राज्य किंवा केंद्र शासनाने सुरू केली तर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावरून देखील अर्ज करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!