शेती अवजारे अनुदानावर खरेदीसाठी अर्ज सुरू; 85% अनुदानावर शेती अवजारे लगेच करा अर्ज, या जिल्ह्यात अर्ज सुरू: Sheti Avjare Kharedi Yojana

शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी केंद्र तसेच राज्य सरकार व राज्य सरकारच्या अंतर्गत जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवित असते. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे शेती उपयोगी अवजारे. जर शेतकऱ्यांना शेती उपयोगी असणारी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांना शेती करणे सहज व सुलभ होईल तसेच शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा खर्च बचत होईल परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. या अनुषंगाने राज्यामध्ये शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदीसाठी विविध प्रकारच्या Sheti Avjare Kharedi Anudan Yojana योजना अंतर्गत लाभ देण्यात येत आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून ८५ टक्के अनुदानावर Sheti Avjare Kharedi Yojana करण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या सन 2022 23 मधील मंजूर आराखड्यानुसार आदिवासी शेतकरी बांधवांना ८५ टक्के अनुदानावर शेती अवजाराचे वाटप करण्यात येत आहे.

 

 

शेती अवजारे अनुदानावर मिळवण्यासाठी कोण अर्ज करू शकतो? Who can apply for subsidized farm implements?

महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी समाजातील म्हणजेच अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार तसेच युवक युवतींना आणि सामूहिक लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या बांधवांना अर्ज करून लाभ मिळवता येणार आहे.

जिल्ह्याचे आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची आवाहन केलेले आहे. जर तुम्ही सुद्धा या जिल्ह्यातील असाल आणि इच्छुक असाल तर Avjare Kharedi Yojana अंतर्गत अर्ज करून 85 टक्के अनुदानावर अवजारे खरेदी करू शकतात.

 

अर्ज करण्यासंदर्भात महत्त्वाच्या तारखा:

हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक व पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह 14 मार्च 2023 ते 28 मार्च 2023 या कालावधीमध्ये जमा करायची आहेत.

 

 

कोणत्या योजनांचा लाभ मिळणार

जिल्ह्यातील आदिवासी समाजातील शेतकरी बांधवांना 85 टक्के अनुदानावर खालील योजनांचा लाभ मिळणार आहे.

1. शेती उपयोगी अवजारे

2. शेती उपयोगी आधुनिक अवजारे

3. रसवंती मशीन

4. इतर अनुषंगिक साधने व साहित्य

वरील प्रकारे अनेक योजनांचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना वितरित करण्यात येणार आहे.

 

शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा! 136 कोटी रब्बी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय जाहीर

 

शेती अवजारे खरेदी योजना करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Sheti Avjare Kharedi Yojana

1. जातीचा प्रमाणपत्र

2. आधार कार्ड

3. उत्पन्न दाखला

4. अर्जदार दारिद्र रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र

5. अर्जदार अपंग असल्यास प्रमाणपत्र

6. अर्जदार विधवा महिला किंवा पारितक्या असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र

7. बँक पासबुक

8. सातबारा

9. रेशन कार्ड

 

वरील कागदपत्र तुम्हाला शेती अवजारे अनुदान खरेदी योजने करिता आवश्यक आहे.

शेळी गट वाटप योजने करिता या जिल्ह्यासाठी नवीन अर्ज सुरू; आत्ताच अर्ज सादर करा

अशाप्रकारे महत्त्वपूर्ण अशी शेती अवजारे खरेदीवर अनुदान देणारी योजना राज्यातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये सुरू असून जर तुम्ही सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास इच्छुक व पात्र असाल तर विहित नमुन्यातील अर्ज अंतिम तारखेच्या पूर्वी सादर करावा.

या जिल्ह्यामध्ये रेशन धारकांना मिळत आहे रेशन ऐवजी पैसे; लगेच हा अर्ज भरा आणि मिळवा रेशन ऐवजी 9000 रुपये

Leave a Comment

error: Content is protected !!