शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढावे तसेच खास करून शेळी पालन हा एक फायदेशीर व्यवसाय असल्यामुळे जास्तीत जास्त पशुपालकांनी शेळीपालन व्यवसाय करावा या दृष्टीने वेळोवेळी राज्य शासन तसेच राज्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यांच्यामार्फत पशुंचा गट वाटप करण्यात येणाऱ्या योजना राबविण्यात येत असतात. शेळी गट वाटप योजने करिता नवीन अर्ज सुरू झालेल्या असून कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या अर्जदारांना अर्ज करता येणार आहे, या Sheli Gat Vatap Yojana Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.
शेळी गट वाटप योजने करिता खालील जिल्ह्यात अर्ज सुरू
शेळी गट वाटप योजना अंतर्गत नंदुरबार जिल्ह्या त नवीन अर्ज सुरू झालेले आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत शहादा तालुक्यासाठी हे नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मीनल करणवाल यांनी एक महत्त्वाचे प्रसिद्धी पत्र काढून शेळी गट वाटप योजना अर्ज सुरू झाल्याची माहिती दिलेली आहे.
शेळी गट वाटप योजना करता कोण अर्ज करू शकतो? Who can apply for Sheli Gat Vatap Yojana?
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील नोंदणीकृत आदिवासी महिला बचत गटांना तसेच अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटांना अर्ज सादर करता येणार आहे.
शेळी गट वाटप योजना नंदुरबार अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख:
नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या शेळी गट वाटप योजना अंतर्गत वरील पात्र लाभार्थ्यांना 14 मार्च 2023 या शेवटच्या तारखेच्या पूर्वी अर्ज सादर करायची आहेत.
शेळी गट वाटप योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे Required Documents for Sheli Gat Vatap Yojana
1. शेळी गट वाटप योजना अंतर्गत महिला बचत गटांना अर्ज करता येणार आहे.
2. अर्ज करणारा महिला बचत गट हा अनुसूचित जमाती चा असावा.
3. अर्ज करणारा बचत गट हा नोंदणीकृत असावा.
4. महिला बचत गटातील किमान एका सदस्याच्या नावावर सातबारा उतारा असावा.
5. जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याबाबत ग्रामसेवक यांच्याकडून दाखला मिळवावा
6. यापूर्वी शासनाच्या अशा कोणत्याही योजना चा लाभ न घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र
7. ग्रामसभेचा ठराव
8. बचत गटातील सदस्यांची यादी
9. बचत गटाचे नावे बँकेत खाते असावे, बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत
10. आधार कार्ड
11. कास्ट सर्टिफिकेट
100 शेळ्या व 10 बोकुड खरेदी करिता नवीन अर्ज सुरू; 50 लाखापर्यंतचा अनुदान जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
शेळी गट वाटप योजना अंतर्गत अर्ज कसा व कुठे मिळेल?
नंदुरबार जिल्ह्यासाठी राबविण्यात येणाऱ्या Sheli Gat Vatap Yojana अंतर्गत ज्या बचत गटांना लाभ मिळवायचा आहे त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज 28 फेब्रुवारी 2023 ते 14 मार्च 2023 यादरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नवापूर रोड नंदुरबार या ठिकाणाहून मिळवायचा आहे. तसेच अर्ज विहित नमुन्यातील व्यवस्थितपणे भरून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून 14 मार्च 2023 पूर्वी जमा करायचा आहे.
अशाप्रकारे नंदुरबार जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी शेळी गट वाटप योजना सुरू करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र असलेल्या महिला बचत गटांनी 14 मार्च 2023 या शेवटच्या तारखेच्या पूर्वी विशेष नमुन्यातील ऑफलाईन अर्ज वरील पत्त्यावर सादर करायचे आहेत.
राज्य शासनाचा महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय; गाई साठी 70 हजार तर म्हशी साठी 80 हजार मिळणार
शेळीपालन अनुदान योजने संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.