सरळ सेवा भरती बाबत राज्य शासनाने घेतला अत्यंत महत्त्वाचा व मोठा निर्णय; प्रत्येक विद्यार्थ्याला हा निर्णय माहीत असावा | Saral Seva Bharti 2023 Decision

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यात सरळ सेवा भरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार असून अनेक विद्यार्थ्यांना आता एक सुवर्णसंधी या निर्णयाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. राज्य शासनाने सरळ सेवा भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय काय आहे. शासनाने घेतलेल्या या Big Decision for Saral Seva Bharti निर्णयाचा फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना होणार संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखा जाणून घेणार आहोत.

 

सरळ सेवा भरती बाबत कोणता निर्णय घेण्यात आला:

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सरळ सेवा भरती ची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी भरतीच्या वयोमर्यादेत 2 वर्षाची शीतलता देण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. Big Decision for Saral Seva Bharti 2023 मुळे अनेक वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या तसेच वयोमर्यादेमुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी यावर्षी शेवटची परीक्षा देऊ शकत होते अशा विद्यार्थ्यांना आता दोन वर्षे परीक्षा देण्याची संधी प्राप्त झालेली आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरती करिता कमाल वयोमर्यादेत 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या जाहिराती करिता दोन वर्षाची सूट देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय लागू केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सरळ सेवा भरतीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचे निवेदन हे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तसेच उदय सामंत यांनी केले होते.

 

या विद्यार्थ्यांकरिता चांगली संधी:

राज्य शासनाच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत गट अ तसेच गट ब, गट क आणि गट ड या पदांच्या उमेदवारांना मोठा दिलासा आणि चांगली संधी आहे. त्यामुळे सरळ सेवेच्या भरतीच्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या व कमाल वयोमर्यादेनुसार जे विद्यार्थी कमाल वयोमर्यादा ओलांडणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना दोन वर्षाची शितलता मिळाल्यामुळे त्यांना दोन वर्षे फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

उदाहरणाद्वारे समजून सांगायचे झाल्यास जर तुम्ही ओपन कॅटेगिरी मधून अर्ज करणार असाल आणि जर ओपन कॅटेगिरी करिता कमाल वयोमर्यादा ही 38 वर्षे असेल तर ती आता इथून पुढे 40 वर्षे असणार आहे. म्हणजे जाहिरातीत प्रसिद्ध झालेल्या कमाल वयोमर्यादा नुसार सर्वच उमेदवारांना दोन वर्षाची शितलता प्रदान करण्यात येणार आहे.

 

75 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने देशाला 75 वर्षे स्वातंत्र्य होऊन पूर्ण झालेल्या असल्यामुळे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 हजार पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया राबवित असताना वेळोवेळी अनेक लोकप्रतिनिधींकडून अनेक प्रकारची निवेदने प्राप्त झालेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व सेवा भरती प्रक्रियेमध्ये कमाल वयोमर्यादेमध्ये जे विद्यार्थी वयोमर्यादा पूर्ण करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना दोन वर्षाची शितलता देण्याचा निर्णय तसेच निवेदन जास्त प्राप्त झाले होते.

रेशन कार्डधारकांना धान्य ऐवजी पैसे वाटप करण्याचा शासन निर्णय जाहीर; रेशन ऐवजी प्रत्येकी 9000 रु मिळवण्यासाठी अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा 

त्यामुळे या सर्व निवेदनाचा विचार करून तसेच कोरोना विषाणूच्या संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांना दोन वर्षे कोणत्याही प्रकारची परीक्षा देता आली नाही तसेच झालेल्या नुकसानीमुळे ते भरून काढण्यासाठी सरळ सेवेमध्ये दोन वर्षाची शितलता देण्यात येत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आलेली आहे अशांना आता चांगली संधी निर्माण झालेली आहे.

आर.टी.ई प्रवेश प्रवेश प्रक्रिया 2023 करिता ऑनलाईन अर्ज सुरू; अंतिम तारखेच्या पूर्वी लगेच अर्ज करा; असा करा अर्ज

 

अशाप्रकारे Saral Seva Bharti तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा व मोठा निर्णय घेतलेला असून राज्यातील अनेक सर्व सेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. सरळ सेवा भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही बातमी अत्यंत महत्त्वाची असून ही माहिती तुमच्या जवळील सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!