शेतकरी बांधवांना आपल्या आजूबाजूला अनेक शेतकऱ्यांचे जमिनीशी संदर्भात अनेक प्रकारचे वाद आहेत. राज्यामध्ये जमिनीचे वाद मिटवण्यासाठी तसेच ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळवण्यासाठी अनेक व्यक्ती कोर्टात दाद मागत असतात. परंतु कोर्टामध्ये दाद मागत असताना दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात तसेच कोर्टामध्ये जमिनीशी संबंधित बातमीसाठी तुमचा पैसा खर्च होतो तसेच वेळही वाया जातो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जमिनीशी संबंधित असणारे सर्व प्रकारचे वाद मिटवण्यासाठी Salokha Yojana सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत फक्त दोन हजार रुपयात तुम्हाला जमिनीशी संदर्भात वाद मिटवता येतात.
संपत्तीचे वाटप करत असताना तसेच वडिलोपार्जित जमिनीचे त्यांच्या वारसदारांना वाटप करत असताना, संपत्तीचे विभाजन करत असताना अनेक प्रकारचे वाद तसेच भांडण तंटे निर्माण होतात. राज्यात जमिनीशी संदर्भातील अनेक वाद आपल्याला पाहायला मिळतात. राज्यामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या नावावर जमीन किती आहे हे सुद्धा माहीत नसते. तसेच असे सुद्धा लोक असतात ज्यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमिनीचा सातबारा असतो परंतु प्रत्यक्षात ते एक एकर सुद्धा जमीन स्वतः वाहत नाहीत.
अनेक व्यक्तींची जमीन दुसऱ्याच्या नावावर असते तसेच जमीन असणारा तिसरा व्यक्ती असतो. याचबरोबर शेतजमिनीच्या रस्त्या संदर्भात किंवा इतरही अनेक प्रकारचे वाद वेळोवेळी पाहायला मिळतात. तसेच शहरीकरणामुळे व औद्योगीकरणामुळे जमिनीचे तुकडे झालेले आहेत त्यामुळे अनेक प्रकारचे वाद नवीन निर्माण झालेले आहे. त्यामुळे या सर्व वाद आणि भांडण तंट्यांवर तंटा काढून ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण अशी Maharashtra Salokha Yojana राज्यात सुरू केलेली आहे.
सलोखा योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारची जमिनीशी संबंधित वाद केवळ 2 हजार रुपयात मिटणार ते येथे पहा
सलोखा योजना काय आहे? What’s Salokha Yojana?
जमिनीशी संदर्भात असणारे वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली असून या सलोखा योजना अंतर्गत केवळ शंभर रुपये नोंदणी फी व अतिशय कमी मुद्रांक शुल्क आकारून जमिनीशी संदर्भातील अनेक प्रकारचे वाद मिटवण्यात येत आहेत. हर एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि शंभर रुपये फी म्हणजे दोन हजार रुपयांच्या आत कोणत्याही प्रकारची जमिनीचे वाद या योजनेअंतर्गत मिटवता येत आहे.
सलोखा योजनेअंतर्गत केवळ दोन हजार रुपयात जमिनीचे वाद मिटविण्यासाठी येथे अर्ज करा
योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ कसा मिळवायचा?
1. सलोखा काय योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याला अर्ज करायचा आहे त्यांनी सर्वप्रथम तलाठ्याकडे अर्ज करावा.
2. अर्जासोबत शेतकऱ्यांनी सातबारा तसेच चतु:सिमा व तलाठी यांनी सांगितलेली इतर कागदपत्रे जोडावी
3. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जावर तलाठी व मंडळ अधिकारी चौकशी करतील.
4. त्यानंतर योग्य त्या पद्धतीने त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देते तसेच त्या जमिनीशी संदर्भित भांडणाचा तोडगा काढून देतील.
सलोखा योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांची यादी येथे पहा