आर.टी.ई मोफत प्रवेश मिळविण्यासाठी ही कागदपत्रे तयार ठेवा; मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी | RTE Free Admission Documents List

आर टी ई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत दरवर्षी गरिबाच्या मुलांना मोफत प्रवेश देण्यात येत असतो. आरटीई प्रवेश प्रक्रिया 2023 24 करिता विद्यार्थी मित्रांना लवकरच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून ज्यांना शिक्षण हकक कायद्याअंतर्गत त्यांच्या पाल्यांची मोफत इंग्लिश मीडियम शाळेत ऍडमिशन करायची आहे त्यांनी कागदपत्रांची जुळवा जुळव करून ठेवावी. आजच्या या लेखात आपण मोफत प्रवेश मिळण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची लिस्ट जाणून घेणार आहोत.

 

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही लवकरच सुरू होत असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना मोफत प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे. यावर्षी RTE Free Admission करिता आधार कार्ड लागण्याची शक्यता असून ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा मुलांना प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आत्तापासूनच rte free admission 2023 प्रवेश प्रक्रिया करिता आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावी.

 

विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई अंतर्गत खाजगी प्राथमिक शाळांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील गरीब मुलांना मोफत प्रवेश मिळवण्यासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत असतात. Mofat Admission प्रक्रिया लवकरच सुरू होण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून माहिती प्राप्त झालेली असून लवकरच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

 

आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलांना मोफत प्रवेश मिळवण्यासाठी आरटीई च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागत असते. त्या करिता त्या विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे असायला पाहिजे. त्यामुळे कोणताही आर्थिक दृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थी मोफत प्रवेशापासून कागदपत्रामुळे वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभागाने अधिसूचना जाहीर करून कागदपत्रा संदर्भात माहिती दिलेली आहे.

 

आर टी ई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये करिता आवश्यक कागदपत्रे Documents Required for RTE Admission

विद्यार्थ्यांच्या पालकांकडे आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करिता खालील कागदपत्रे असायला पाहिजे. खालील सर्व कागदपत्रे ही ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारखेपर्यंतचीच असावी. त्यानंतरची तसेच त्यानंतरच्या तारखेची कोणतीही कागदपत्रे स्वीकारण्यात येणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी.

1. रहिवासाबाबत पुरावा – मोफत प्रवेश प्रक्रिया करिता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांपैकी महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे रहिवासा बाबत पुरावा आहे. यामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, मतदान कार्ड, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणताही एक पुरावा जोडू शकतात.

2. वंचित जात प्रवर्गातील असल्याबाबत जातीचा दाखला

3. जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याबाबत प्रमाणपत्र (40 टक्के किंवा 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र)

4. विद्यार्थी एचआयव्ही बाधित असल्यास त्याबाबत शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र

5. वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकारी यांच्याकडून मिळवलेला)

6. जन्माचा दाखला

7. बालकाची आई घटस्फोटीत महिला असल्यास त्याबाबत आवश्यक कागदपत्र

8. विधवा महिला असल्यास त्याबाबत कागदपत्र (पतीचे मृत्युपत्र, बालकाच्या आईचा रहिवासी दाखला)

 

वरील सर्व कागदपत्रे ही Rte 25% मोफत प्रवेश करिता यावर्षी लागणार आहे. याव्यतिरिक्त इतर काही आवश्यक कागदपत्रे हवी असल्यास तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या आरटीई च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पहावीत.

 

Rte 25% मोफत प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? ते येथे पहा

 

आमच्या या वेबसाईटवर तुम्हाला आरटीई मोफत 25% प्रवेश संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट मिळत राहतील.

 

आर टी ई 25% मोफत प्रवेश मिळवण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ते येथे पहा

 

अश्या प्रकारे राज्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार गरिबाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळवून देण्यासाठी तसेच खाजगी नामांकित शाळेत चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ही rte योजना राबविण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!