आर.टी.ई प्रवेश प्रवेश प्रक्रिया 2023 करिता ऑनलाईन अर्ज सुरू; अंतिम तारखेच्या पूर्वी लगेच अर्ज करा; असा करा अर्ज | RTE Admission 2023 Start

आरटीई प्रवेश प्रक्रिया 2023 करिता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ज्या पालकांना त्यांच्या पाल्यांना मोफत नामांकित शाळेत प्रवेश मिळवून द्यायचा आहे, त्यांनी आता अर्ज करायचे आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के राखीव जागा साठी मोफत प्रवेश करता ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेले आहे. या लेखात आपण RTE Admission 2023 अंतर्गत मोफत प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तसेच त्याकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रे यासंदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

आर.टी.ई. प्रवेश प्रवेश प्रक्रिया 2023 कधी सुरू झाली?

Rte admission 2023-24 हि 01 मार्च 2023 ला दुपारी 03 वाजे पासून सुरू झालेली आहे. या rte admission अंतर्गत आता पालकांना त्यांच्या पाल्यांना मोफत नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

 

आर.टी.ई. 25% प्रवेश प्रवेश प्रक्रिया 2023 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख:

Rte अंतर्गत पालकांना त्यांच्या पाल्यांना नामांकित शाळेत ऍडमिशन मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने 17 मार्च 2023 रात्री 12 वाजे पर्यंत अर्ज करता येणार आहे. आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 मार्च आहे.

 

RTE मोफत प्रवेश अंतर्गत पालका कडील सर्व कागदपत्रे हे अर्ज करण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वीच्या तारखेची असावी. तसेच पालकांना हमीपत्र सुद्धा द्यावे लागेल.

 

मोफत प्रवेश करिता अर्ज कसा करायचा? How to Apply For RTE Admission 2023

Rte 25% मोफत प्रवेश अंतर्गत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणाचा कायद्याच्या आरटीई वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज सादर करायची आहे. महाराष्ट्र शासनाने आर्थिक दृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे. Rte अंतर्गत मोफत प्रवेश करण्याचे काम मी तुम्हाला खाली उपलब्ध करून दिली आहे.

 

RTE अंतर्गत मोफत प्रवेश करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे येथे पहा

 

ज्या पालकांना त्यांच्या पाल्याची मोफत ऍडमिशन करायची आहे त्यांनी सर्वप्रथम आरटीई महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवरून या संदर्भात विस्तृत माहिती वाचून घ्यायची आहे.

 

RTE Admission अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

आर्थिक दृष्ट्या वंचित घटकातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायदा मार्फत नामांकित इंग्रजी शाळांमध्ये मोफत ऍडमिशन मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांची अर्ज योग्य पद्धतीने अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेच्या पूर्वी सादर करावेत.

 

आरटीई मोफत प्रवेशांतर्गत महाराष्ट्र शासनाने सर्व बाबी नवीन अपलोड केलेल्या असून त्याकरिता संबंधित पालकांनी वयोमर्यादा संदर्भातील माहिती तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच अटी व शर्ती व नवीन बदल केलेल्या या वर्षाच्या सर्व बाबी आवश्यक पणे अधिकृत वेबसाईटवरून स्वतः वाचून घ्यावे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

Leave a Comment

error: Content is protected !!