रेशन कार्डधारकांनो धान्य ऐवजी पैसे मिळवण्यासाठी अर्ज सुरू; रेशन ऐवजी वार्षिक 9 हजार रुपये मिळविण्याचा अर्ज असा करा; लगेच करा अर्ज | Ration Maharashtra Update

रेशन कार्डधारकांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना आता रेशन धान्य एवजी पैसे वितरण करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण अशा शासन निर्णयानुसार ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत अर्ज देखील सुरू करण्यात आलेले आहे. या लेखात आपण रेशन कार्ड धान्याऐवजी पैसे देण्याच्या योजना Ration Maharashtra संदर्भात अर्ज प्रक्रिया तसेच शासन निर्णय या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेत आहोत.

 

राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आता Ration Dhanya मिळणार नसून त्या रेशन कार्ड धारकातील कुटुंबांना थेट पैसे वितरण होणार आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत प्रणाली विकसित केलेल्या असून डीबीटी च्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना बँक खात्यामध्ये पैशाचे वितरण करण्यात येणार आहे.

 

रेशन धान्य एवजी पैसे मिळणाऱ्या योजनेची लाभ वितरण प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत रेशन कार्डधारकांना रेशन धान्य एवजी पैसे मिळवून देणाऱ्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला पात्र असणाऱ्या Ration Card धारकांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जदारांनी अर्जासोबत उपलब्ध करून दिलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची तसेच अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची PFMS मध्ये Payment File तयार करण्याची येईल.

 

त्यानंतर सर्व माहिती संगणकीकृत करून त्याचा संपूर्ण डाटा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला ही रक्कम जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत त्यानंतर तिथून ती रक्कम लाभार्थ्यांना मिळणार आहे.

 

रेशन धान्य ऐवजी पैसे मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयामध्ये करावयाच्या अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिलेला आहे. योजनेअंतर्गत लाभ मिळवून इच्छिणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून सादर करावा लागेल.

 

रेशन धान्य एवजी पैसे वितरण करण्याचा शासन निर्णय येथे पहा

 

वरील लिंक वरून तुम्ही महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या या योजने अंतर्गत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय पाहू शकतात. त्याचबरोबर या शासन निर्णयाच्या शेवटच्या पेजवर अर्जाचा पीडीएफ देखील समाविष्ट आहे. तो अर्ज संबंधित अर्जदार लाभार्थ्यांनी जमा करायचा आहे.

 

रेशन धान्य एवजी पैसे मिळवण्याचा अर्ज pdf येथे पहा

 

वरील लिंक वरून Ration Card धारकांनी जर त्यांना रेशन ऐवजी पैसे हवे असेल तर तो अर्ज व्यवस्थितपणे भरून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून जमा करावा लागेल.

 

लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येईल

या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला प्राप्त झालेल्या नवीन अर्जावर तहसीलदार यांच्यामार्फत चौकशी करून तसेच छाननी प्रक्रिया पूर्ण करून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना नवीन यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल तसेच मयत झालेल्या लाभार्थ्यांची नावे बदलण्यात येईल तसेच अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची नावे वगळून नवीन यादी तयार करून ती जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल.

जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडील अंतिम यादी मध्ये नाव असलेल्या लाभार्थ्यांना रेशन धान्य एवजी पैसे मिळतील.

 

रेशन धान्य एवजी पैसे मिळवण्याचा शासन निर्णय व अर्जाचा pdf नमुना येथे पहा

 

मित्रांनो अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महाराष्ट्र शासन महत्त्वपूर्ण अशी धान्याऐवजी पैसे वितरण करणारी योजना राबविण्यात येत आहे. या लेखात आपण योजनेअंतर्गत नवीन जाहीर झालेला शासन निर्णय आणि अर्जाच्या नमुनाचा पीडीएफ याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे.

ही माहिती सर्वांसाठी महत्त्वाची असल्यामुळे तुमच्या जवळील सर्व नातेवाईकांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!