रेशन कार्डधारकांना धान्य ऐवजी पैसे वाटप करण्याचा शासन निर्णय जाहीर; रेशन ऐवजी प्रत्येकी 9000 रु मिळवण्यासाठी अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा | Ration Changes Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत रेशन कार्डधारकांना आता रेशन धान्य ऐवजी पैसे वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत रेशन कार्डधारकांना रेशन धान्य वितरित करणे ऐवजी पैसे वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. आता या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रेशन धान्य ऐवजी पैसे मिळणार आहे. तसेच ते पैसे कसे मिळणार त्याकरिता अर्ज कसा करायचा या Ration Changes ची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

रेशन धारकांना धान्याऐवजी पैसे वितरणाचा शासन निर्णय जाहीर

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांना तसेच नागपूर विभाग तसेच वर्धा विभागातील एपीएल म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे.

या लेखाच्या शेवटी आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासनाने रेशन धान्य ऐवजी पैसे देणारी योजना सुरू करून त्या योजनेला मान्यता देणारा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलेला आहे, तो आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.

 

रेशन धान्य ऐवजी पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार?

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय नुसार राज्यातील खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन धान्य ऐवजी पैसे वितरण होणार आहे.

1. औरंगाबाद

2. जालना

3. नांदेड

4. बीड

5. उस्मानाबाद

6. परभणी

7. लातूर

8. हिंगोली

9. अमरावती

10. वाशिम

11. अकोला

12. बुलढाणा

13. वर्धा

14. यवतमाळ

वरील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता रेशन कार्ड ऐवजी धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.

 

रेशन धान्य ऐवजी पैसे देणारी योजना काय आहे?

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात यापूर्वी वरील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन रुपये किलो व दोन रुपये किलो तांदूळ या दराने स्वस्त अन्नधान्याचे वाटप करण्यात येत होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार केंद्र शासन या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय कमी रकमेमध्ये धान्याचे वाटप करत होते.

परंतु मधल्या काही वेळामध्ये ही योजना बंद करण्यात आल्यामुळे अनेक आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान्य ऐवजी पैसे देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढून योजना सुरू केलेली आहे.

 

योजने अंतर्गत रेशन धान्य ऐवजी पैसे किती व कसे मिळणार?

रेशन धान्य एवजी पैसे देणाऱ्या या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणारे पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT च्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात येणार आहे. या रेशन Maharashtra Changes योजने अंतर्गत प्रति लाभार्थी 150 रुपये मिळणार आहे. म्हणजेच एका कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर त्या कुटुंबाला एका वर्षांमध्ये 9 हजार रुपये मिळणार आहे.

योजनेअंतर्गत मिळणारे पैसे हे कुटुंबातील लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या महिलेकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक खाते असायला पाहिजे. तसेच बँक खाते हे आधार कार्ड सोबत संलग्न असावे लागते. योजनेअंतर्गत मिळणारी सर्व रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात dbt च्या माध्यमातून जमा करण्यात येईल. महिलेचे बँक खाते नसल्यास ते ओपन करून घ्यावे लागेल किंवा तहसीलदार यांचे संगतीने इतर सदस्याच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी विनंती करावी लागेल.

 

रेशन धान्य ऐवजी पैसे वितरित करण्याचा शासन निर्णय येथे क्लिक करून पहा

 

वितरित करण्यात येणाऱ्या रकमेमध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार?

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत रेशन कार्डधारकांना रेशन धान्य एवजी पैसे वितरित करण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार प्रति महाप्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम डीबीटीचे माध्यमातून हस्तांतरित करण्यासाठी मान्यता देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात महागाई वाढल्यानंतर तसेच अन्नधान्याच्या किमती वाढल्यानंतर लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत मिळणारे पैसे कमी वाटेल त्यामुळे वितरित करण्यात येणाऱ्या पैशांमध्ये देखील वाढ करता येणार आहे.

 

रेशन धान्य ऐवजी पैसे मिळवण्या संदर्भातील शासन निर्णय व पीडीएफ अर्ज येथे क्लिक करून पहा

 

रेशन ऐवजी चे पैसे मिळण्याचा अर्ज कसा करायचा?

रेशन कार्डधारकांना जर तुम्हाला Ration एवजी पैसे मिळवायचे असेल तर तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज सादर करावे लागेल. अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच शासन निर्णय देखील खाली उपलब्ध आहे तो वाचून घ्यावा.

 

रेशन धान्य ऐवजी पैसे मिळण्याचा अर्ज येथे करा

 

वरील लिंक वरून तुम्ही Ration Dhanya ऐवजी पैसे मिळवण्याचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय पाहू शकतात. तसेच अर्जाचा पीडीएफ देखील मिळवू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!