शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा! 136 कोटी रब्बी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय जाहीर | Rabbi Pik Vima Maharashtra

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिक विमा 2022 23 हा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांना रब्बी पिक विम्याची वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 136 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता राज्यातील रब्बी पिक विमाधारक व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच पिक विम्याची वाटप करण्यात येणार आहे. 136 कोटी pik vima वितरणाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला असून या संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल 136 कोटी

शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिक विमा 2022 23 काढलेला आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांची रब्बी पिकांची नुकसान झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी राज्य शासनाने Rabbi Pik Vima कंपन्यांना 136 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता लवकरच करण्यात येईल अशी अपेक्षा बाळगुया.

 

136 कोटी रुपये वितरणाचा शासन निर्णय प्रकाशित

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील पाच पीक विमा कंपन्यांना ज्या पिक विमा कंपनीने राज्यांमध्ये Rabbi Pik Vima Yojana 2022 23 राबवलेली होती, अशा कंपन्यांना 136 कोटी रुपये वितरित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. जर तुम्हाला रब्बी पिक विमा वितरणा संदर्भात हा शासन निर्णय पहायचा असेल तर त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

रब्बी पिक विमा 136 कोटी रुपये वितरणाचा शासन निर्णय येथे पहा

वरील लिंक वरून तुम्ही नुकताच जाहीर झालेला Rabbi Pik Vima Yojana 2023 निधी वाटपा संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतात.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा 25% पीक विमा मंजूर आत्ताच यादीत आपले नाव पहा 

रब्बी पिक विम्याचे लवकरच वाटप होण्याची शक्यता

शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाने 136 कोटी रुपयांचा हा जाहीर केलेला निधी अग्रीम स्वरूपात आहे. म्हणजेच राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधीचे वाटप व्हावे यासाठी आगाऊ स्वरूपात हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे pik vima कंपन्या मार्फत सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सर्वांची अपेक्षा असून त्याबाबत शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

या जिल्ह्यासाठी सुप्रीम कोर्टाने 510 कोटींचा पीक विमा केला मंजूर

अशाप्रकारे आपण रब्बी पिक विमा संदर्भात निधी वितरणाची एक छोटीशी अपडेट जाणून घेतलेली आहे. ही माहिती सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!