शेतकरी बांधवांनो राज्यातील रब्बी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. राज्य शासनाने राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी Rabbi Pik Vima काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची वाटप व्हावी याकरिता अग्रीम स्वरूपात शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा या दृष्टीने 136 कोटी रुपये वितरित करून शासन निर्णयाच्या माध्यमातून त्याला मान्यता दिलेली आहे. कोणते शेतकरी पात्र ठरणार, कोणत्या शेतकऱ्यांना हा विमा मिळेल या संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्राच्या प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत Rabbi Pik Vima Yojana राबविण्यात आलेली होती. आपल्या महाराष्ट्र राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी यांच्यात आखत्यारी पाच विमा कंपन्या द्वारे ही विमा योजना राज्यात राबविण्यात आलेली होती. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकांना विमा कवच प्राप्त व्हावे या दृष्टीने रब्बी पिक विमा काढलेला होता.
रब्बी पिक विमा साठी अग्रीम स्वरूपात 136 कोटी मंजूर:
राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिक विम्याचे वाटप व्हावे याकरिता राज्य शासनाच्या हिस्सावर येणारी 136 कोटी रुपयांची रक्कम अग्रीम स्वरूपात वाटप केलेली आहे. त्यामुळे राज्यातील रब्बी पिक विमा धारक शेतकऱ्यांना अग्रीम pik vima मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हा निधी राज्य शासनाने पिक विमा कंपन्यांना वाटप केलेला असून आता पिक विमा कंपन्या राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करतील.
पिक विमा कंपन्या प्रत्येक वेळेस राज्य शासनाचा तसेच केंद्र शासनाचा विमा कंपनीस मिळवायचा हप्ता प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा करत असते.
136 कोटी रब्बी अग्रीम पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल?
शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत Rabbi Pik Vima साठी जाहीर केलेला 136 कोटी रुपयांचा निधी हा पिक विमा कंपन्यांना अग्रीम स्वरूपात वाटप करण्यात आलेला असून राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झालेले आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्यांकडे पिक विमा नुकसान भरपाई दावा दाखल केलेला आहे, अशाच शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांमार्फत अग्रीम स्वरूपात पीक विम्याचे वाटप करण्यात येईल.
136 कोटी पिक विमा कोणत्या शेतकऱ्याना मिळेल त्यांची नावे येथे पहा
रब्बी पिक विमा वाटपाचा शासन निर्णय जाहीर:
महाराष्ट्र शासनाच्या मार्फत रब्बी पिक विमा धारक शेतकऱ्यांना पिक विम्याची वाटप करण्यासाठी पिक विमा कंपनीस वितरित करावयाचा 136 कोटी रुपयांचा निधी वितरित करून शासन निर्णयाच्या द्वारे त्याला मान्यता दिलेली आहे. जर तुम्हाला सविस्तर शासन निर्णय पहायचा असेल तर त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
136 कोटी रब्बी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय येथे पहा
रब्बी हंगाम 2021-22 करिता 36 कोटी रुपयांची निधी विचारणारा शासन निर्णय येथे पहा
एक छोटीशी अपडेट जाणून घेतलेली आहे. ही माहिती सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.