एका अंड्याची किंमत 100 रुपये असणाऱ्या या कोंबडीच्या जातीसमोर कडकनाथ सुद्धा ठरली फेल; खूप फायदेशीर कोंबडी: Poultry Farming

शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय करत असतात. देशातील काही भागांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे 4 ते 5 कोंबड्या असतात. कुक्कुटपालन हा एक फायदेशीर व्यवसाय असून जर आपण चांगल्या जातीच्या कोंबड्या पाळल्या तर आपण खूप जास्त नफा कमवू शकतो. आजच्या पोस्टमध्ये आपण कोंबडी च्या एका विशिष्ट जाती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत, या कोंबडीच्या अंड्याला किंमत शंभर रुपये इतकी असते. या प्रकारची माहिती तुम्ही यापूर्वी कदाचित ऐकली सुद्धा नसेल त्यामुळे ही Poultry Farming माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

कुक्कुटपालन हा एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय असल्यामुळे दिवसेंदिवस अनेक शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहत आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस कुकुट पालन व्यवसायामध्ये विविध प्रकारच्या नवनवीन जातीच्या कोंबड्यांचा समावेश होत असून या कोंबड्यांची आपण पालन केल्यास इतर कुकुट पक्षांपेक्षा जास्त प्रमाणात नफा कमवू शकतो. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय त दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये Poultry Farming ideas उत्पादित होणाऱ्या अंडे आणि मास यांचे प्रमाण वाढलेले आहे.

 

त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवून थेट शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना अनुदान देण्यात येते. शासनाच्या मार्फत कुक्कुटपालनाकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनेचे महत्त्वपूर्ण असे उदाहरण म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान योजना होय.

 

कुक्कुट पालन व्यवसाय मध्ये मागील काही वर्षात कोंबड्यांच्या अनेक जाती आलेल्या आहेत, त्यामध्ये सर्वात सर्व लोकांना भुरळ पडणारी महत्त्वाची कोंबड्याची जात म्हणजे कडकनाथ कोंबडी होय. परंतु या कडकनाथ कोंबडी पेक्षाही अशा काही जाती आहेत ज्या कुकुट पालकांना महत्त्वाच्या तसेच फायदेशीर ठरणार आहे.

 

 

कुक्कुटपालनामध्ये खूप फायदेशीर ठरत आहे असील कोंबडी

पशुपालकांना कुक्कुटपालनामध्ये कोंबड्याची महत्त्वाची जात म्हणजे असील कोंबडी होय. ही कोंबडी खऱ्या अर्थाने उच्च कार्यक्षमता तसेच दिमागदार रूप आणि संघर्ष कौशल्यासाठी परिचित अशी कोंबडी आहे. कोंबड्यांची ही एक देशी जात असून झुंज येण्यासाठी ती प्रचलित आहे. या जातीतील कोंबड्यांची झुंज लावण्यात येत असते. ही कोंबडी दिमागदार उपसलेली राजेशाही दिसते. या Aseel Chicken Poultry Farming कोंबड्यांमध्ये नर कोंबड्याचे वजन 3 किलो ते चार किलो असते तर मादी कोंबडीचे वजन 2 किलो ते 3 किलो इतके असते.

 

कुक्कुट पालन योजनेसाठी मिळत आहे 25 लाख अनुदान; जाणून घ्या, अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती

 

असील कोंबडीचे वैशिष्ठ्ये Aseel Chicken Poultry Farming Information

कुकुट पालना मधील असील कोंबडीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कोंबडी वार्षिक 92 अंड्याचे उत्पादन करते, या कोंबडीच्या चाळीस आठवड्यात अंड्याचे वजन 50 ग्रॅम होते. असील नावाची कोंबडी अंड्यांसाठी नव्हे तर खास करून मास उत्पादनासाठी पाळली जाते. ही कोंबडी इतर कोंबड्यांपेक्षा कमी अंडे देत असून वर्षाला केवळ 60 ते 70 अंडी घेण्याची क्षमता या कोंबडी मध्ये असते परंतु या कोंबडीची अंडी ही दुर्मिळ असतात. या कोंबडीच्या अंड्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते या कोंबडीच्या अंड्याच्या सेवनामुळे डोळ्याची अनेक आजार बरे होत असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे अतिशय फायदेशीर असलेल्या असील कोंबडीचे अंडे हे 100 रुपयांना विकत घेतले जाते.

 

दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून तब्बल 25 लाख रुपये कर्ज; असा करा ऑनलाईन अर्ज

 

असील कोंबडी कोणत्या राज्यात आढळते? Asil chicken is found in which state?

खास करून असील कोंबडीची जात राज्यस्थान तसेच आंध्र प्रदेश त्याचबरोबर पंजाब या ठिकाणी आढळते. ही कोंबडी महाराष्ट्रामध्ये आढळत नसून वरील राज्यांमध्ये या कोंबड्या खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. जास्तीत जास्त पशुपालक या कोंबड्या मास उत्पादनासाठी पाळतात. परंतु या कोंबडीच्या अंड्यांना सुद्धा खूप मागणी आहे त्यामुळे शंभर रुपयापर्यंत कोंबडीचे एक अंड विकल्या जाते.

 

Leave a Comment

error: Content is protected !!