शेतकरी बांधवांनो केंद्र शासनाच्या मार्फत देशातील शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13 हप्ते वितरित झालेल्या असून जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता जमा झाला का हे पाहण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नसून ते आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने चेक करता येते. त्याकरिता तुम्हाला PM Kisan Yojana Status चेक करावे लागेल.
शेतकरी बांधवांना Pm Kisan Yojana अंतर्गत अनेक शेतकरी असे आहेत जे खेडेगाव मध्ये राहत असून त्यांच्या बँका त्यांच्या गावापासून खूप दूर आहेत, तसेच pm Kisan Yojana च्या बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाल्याचा एसएमएस प्राप्त होत नाही, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शंभर ते दोनशे रुपये खर्च करून बँकेमध्ये जाऊन चेक करावे लागेल. त्यामुळे पैसे तर खर्च होतात त्याचबरोबर वेळेचीही मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
त्यामुळे आपण आजच्या या लेखात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का ते चेक करण्याची ऑनलाईन पद्धत जाणून घेणार आहोत.
पी एम किसान योजनेचे 2000 आले का ते खालील प्रमाणे चेक करा
Pm Kisan Yojana अंतर्गत केंद्र शासनाने दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर ते तुमच्या खात्यात आले का ते पाहण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
1. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
2. https://pmkisan.gov.in/ ही पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.
3. आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ‘Farmers Corner’ नावाचा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
4. आता तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ‘Beneficiary Status’ नावाचा एक ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला ओके करायचं आहे.
5. आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेले आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा तुमचा मोबाईल क्रमांक जो तुमच्या पीएम किसान योजने अंतर्गत नोंदणी करत असेल तो किंवा तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करायचा आहे.
6. आता तुम्ही वरील माहिती भरल्यानंतर तुम्हाला ‘Get Data’ या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
7. आता तुमच्यासमोर तुमच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे संपूर्ण स्टेटस ओपन झालेले असेल.
8. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पीएम किसान संबंधित योजनेची दोन हजार रुपयाची रक्कम जमा झालेली आहे की नाही ते दिसत असेल त्याचबरोबर तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झालेली आहे, याची सुद्धा माहिती pm Kisan Yojana Status online chec करून त्या ठिकाणी दिसत असेल.
अकरा कोटीपेक्षा जास्त लाभार्थी मिळवत आहे रक्कम
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत संपूर्ण देशभरातून 11 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजनेअंतर्गत राशी जमा करण्यात येत आहे. पी एम किसान योजना ही केंद्र शासनाच्या मार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना असून संपूर्ण देशभरातील कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून लाभ मिळवता येतो.