पी एम किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले नसल्यास, अशी करा तक्रार,; लगेच मिळेल पैसे, पैसे खात्यात जमा झाले का चेक करा ऑनलाईन | PM Kisan Yojana Complaint

शेतकरी बांधवांनो संपूर्ण देशभरात राबविल्या येणारी पी एम किसान योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. संपूर्ण देशभरातील शेतकरी बांधवांना केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रुपयाची रक्कम प्रोत्साहन म्हणून देते. या पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात येते. त्यामुळे योजनेअंतर्गत अर्जामध्ये काही चुकी असल्यास किंवा इतर काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एखाद्या वेळेस पैसे येत नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी लगेच PM Kisan Yojana अंतर्गत खालील प्रमाणे तक्रार करून हप्त्याचे पूर्ण पैसे मिळवता येते.

 

पी एम किसान अंतर्गत 13 हप्ते वितरित

केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात pm Kisan Yojana पैश्याचे वितरण करण्यात आलेले आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे. संपूर्ण देशभरातील पी एम किसान योजनेच्या अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16 हजार 400 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

 

जवळपास देशातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात pm Kisan 13th Installment जमा झालेला असून जर तुमच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता अजून पर्यंत जमा झालेल्या नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने ते मिळवू शकतात याची सुद्धा संपूर्ण माहिती आम्ही या लेखात तुम्हाला खाली दिलेली आहे.

 

पी एम किसान योजना अंतर्गत खात्यात पैसे न आल्यास तक्रार कशी करायची? How to complain about PM Kisan Yojana?

शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत 13 हप्त्याची वितरण झालेले असून जर तुमच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा एखादा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्ही त्याकरिता तक्रार दाखल करू शकतात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास ती दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्फत हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे. या हेल्पलाइन क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांची तक्रार नोंदविता येणार आहे. तसेच पीएम किसान संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा काही समस्या असल्यास किंवा अतिरिक्त काही माहिती विचारायची असल्यास जाहीर करण्यात आलेल्या नंबर वर कॉल करून तुम्ही त्याबद्दल माहिती मिळू शकतात तसेच तक्रार दाखल करू शकतात.

 

जर तुम्हाला PM Kisan Yojana च्या मार्फत नुकत्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेल्या 13 व्या हप्ता संदर्भात काही अडचण असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तसेच तक्रार करायची असेल तर 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधता येईल.

 

पी एम किसान योजना ऑनलाइन तक्रार कशी करायची? How to complain online under PM Kisan Yojana?

शेतकरी बांधवांना पीएम किसान योजना संदर्भात जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा काही तक्रार करायची असेल तर तुम्ही वरील क्रमांकावरून कॉल करून तक्रार नोंदवू शकतात तसेच pmkisan-ict@gov.in या ईमेलवर देखील तुमची तक्रार मेल करून नोंदवू शकतात.

 

पी एम किसान योजनेचे 2000 तुमच्या खात्यात आले का ते येथे क्लिक करून चेक करा लगेच

 

तक्रार करण्याची वेळ:

पीएम किसान योजना अंतर्गत जर तुम्हाला तेरावा हप्ता प्राप्त झालेल्या नसेल किंवा आतापर्यंत कोणत्या तुम्हाला पीएम किसान योजना अंतर्गत प्राप्त झालेली नसेल तसेच जर पी एम किसान योजनेचा अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा अर्ज तुमचा रिझल्ट झालेला असेल तर तुम्ही याबद्दल अधिक माहिती मिळू शकतात तसेच याची तक्रार नोंदवू शकतात.

 

पी एम किसान योजनेचे 2000 खात्यात जमा झाले का? ते येथे चेक करा ऑनलाईन

 

पी एम किसान योजनेची तक्रार तुम्ही वरील क्रमांकावर कॉल करून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये तक्रार नोंदवू शकतात. ऑनलाइन ईमेलद्वारे तक्रार केल्यास कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन नाही. दिवसाच्या चोवीस तासांपैकी कधीही तुम्ही तुमची तक्रार ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!