शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना पिक विमा वाटप करण्यासाठी पिक विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणाऱ्या राज्य हिष्याची 36 कोटी रुपये इतकी रक्कम पिक विमा कंपन्यास वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून मान्यता देऊन निधी वितरित केलेला आहे. पिक विमा रब्बी हंगामाच्या वाटपासाठी शासनाने वितरित केलेल्या या Pik Vima Yojana Nidhi वाटप संदर्भात थोडक्यात माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये सन 2021-22 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना ही राबविण्यात आलेली होती. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगामा करिता भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या मार्फत पाच विविध प्रकारच्या कंपन्यांनी रब्बी हंगाम पिक विमा योजना राबवली होती. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मार्फत pik vima कंपन्यांना शासनातर्फे विमा हप्त्याची रक्कम जमा करावी लागत असते. ही रक्कम मंजूर करून काल महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण असा नवीन शासन निर्णय काढून निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे.
36 कोटी रुपये पिक विमा रक्कम कुणाला मिळणार?
त्यामुळे आता सन 2021 व 22 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिक विमा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांना आता अजून शेतकरी पात्र असून सुद्धा अजून पर्यंत नुकसान मिळाले नव्हते, अशा शेतकरी बांधवांना पिक विमा कंपन्या मार्फत Pik Vima Nuksan Bharpai वितरित करण्यात येणार आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिक विमा 2021 22 मध्ये उतरवलेला होता, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याची चान्सेस आता वाढलेली असून महाराष्ट्र शासनाने पिक विमा कंपनींना Pik Vima Vatap करण्यासाठी 36 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे.
36 कोटी रब्बी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय जाहीर
महाराष्ट्र शासनाने काल महत्त्वपूर्ण असा पिक विमा योजने संदर्भात निधी वाटपाचा शासन निर्णय काढून रब्बी हंगाम 2021 22 करिता 36 कोटी रुपये इतका निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या परंतु अजून पर्यंत पिक विमा नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना pik vima मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून निधी वितरित केल्याचा शासन निर्णय जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. खाली लिंक वरून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये शासन निर्णय डाऊनलोड करून पाहू शकतात.
रब्बी हंगाम 2021-22 करिता 36 कोटी रुपयांची निधी वितरित केल्याचा शासन निर्णय येथे पहा
वरील लिंक वरून तुम्ही पिक विमा करिता 36 कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याचा शासन निर्णय सविस्तरपणे वाचू शकतात.