शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; 244 कोटी पीक विमा मंजूर; हे शेतकरी ठरणार पात्र; जाणून घ्या कुणाला मिळेल पीक विमा | Pik Vima Manjur

राज्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यात पिक विमा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विम्याची वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 244 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून वितरणास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता राज्यातील पिक विमा पासून वंचित असणारे शेतकरी तसेच पीक विम्याचा केवळ पहिला हप्ता मिळालेले शेतकरी किंवा अतिशय कमी pik vima मिळालेली शेतकरी पात्र ठरवून त्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाने 01 मार्च 2023 रोजी महत्वपूर्ण असा शासन निर्णय काढून पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे वाटप करण्यासाठी राज्य हिष्याची 244 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करून वितरित केलेली आहे. त्यामुळे आता राज्यातील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरिपाचा पिक विमा मिळणे शक्य होणार आहे. राज्यात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना अजून पर्यंत पिक विमा कंपन्या मार्फत पिक विमा मिळालेला नाही. त्यामुळे आता अशा शेतकऱ्यांना kharip pik vima मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात pik vima yojana 2022 ही खरीप व रब्बी हंगामा करिता भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत तसेच बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी आणि एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी तसेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच कंपन्यांनी राबवली होती. त्यामुळे वरील पाच कंपन्यांना पिक विम्याची वाटप शेतकऱ्यांना करण्यासाठी राज्य शासनाने त्यांच्या हिष्यावर येणारी व बाकी असलेली 244 कोटी रुपये रक्कम वितरित केलेली आहे.

 

244 कोटी रुपये पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार

राज्यात वरील पाच कंपन्यांनी राज्य शासनाकडे pik vima अनुदानाची मागणी केलेली होती. शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या पिक विमा हप्त्यापोटी ही मागणी करण्यात आलेली असून राज्य शासनाने ती मान्य करून 244 कोटी रुपये इतका निधी वितरित केलेला आहे.

त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत पिक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना पिक विम्याची वाटप करण्यात येणार आहे. खरीप पिक विमा 2022 पासून वंचित असणारे शेतकरी पात्र ठरवून त्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे.

 

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा 25% पीक विमा मंजूर  लगेच यादीत नाव पहा 

 

शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्यांना कॉल करून किंवा कोणत्याही माध्यमाद्वारे पिक विम्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याकडून राज्य शासनाचा हिस्सा मिळणे बाकी आहे असे कारण सांगण्यात येते. परंतु आता राज्य शासनाने त्यांच्या हिष्यावरील सर्व रक्कम वितरित केल्यामुळे पिक विमा कंपन्यांनी ती रक्कम आता शेतकऱ्यांना वाटायची आहे.

 

पीक विमा 2023 मंजूर 724 कोटी रुपये निधी वितरीत; लगेच पहा

244 कोटी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय जाहीर:

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2022 करिता राज्य हिष्याच्या अनुदानापोटी राज्य शासनाने pik vima कंपन्यांना 244,86,25,869 (244 कोटी 86 लाख 25 हजार 869 रुपये) इतकी रक्कम वितरित केलेली असून त्याबाबत नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे. जर तुम्हाला हा शासन निर्णय सविस्तरपणे वाचायचा असेल तर त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली.

 

पिक विमा योजना 244 कोटी वितरणाचा शासन निर्णय येथे पहा

 

वरील लिंक वरून तुम्ही महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला पिक विमा संदर्भात निधी वितरणाचा शासन निर्णय वाचू शकतात, तसेच ते तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!