इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी; राज्य शिक्षण मंडळाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय | Paper Leak Case Maharashtra

विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या मार्फत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेतील गणित या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील पेपर फुटी प्रकरणावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतलेला असून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

 

गणिताच्या पेपरला घडले होते पेपर फुटीचे प्रकरण:

इयत्ता बारावीच्या परीक्षेत दरम्यान बारावीचा गणित विषयाचा पेपर सुरू असताना प्रश्नपत्रिका तील दोन पाने एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल केल्याच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हायरल झालेल्या Paper Leak Case संदर्भात महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

 

फुटलेला पेपर कोणत्याही विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचल्याने आढळून आले:

राज्यात 3 मार्च 2023 रोजी गणित विषयाचा पेपर घेण्यात आलेला होता. या पेपर दरम्यान सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून गणिताच्या पेपरची प्रश्नपत्रिका तील दोन पेज व्हायरल केल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर प्रकाशित झालेल्या असताना वायरल झालेल्या या प्रश्नपत्रिका राज्यात कुठेही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या नसल्याची आढळून आलेले आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून पेपर पुढच्या घटना ची बातमी वायरल झाल्यानंतर असे लक्षात आले की 10.30 नंतर हा पेपर वायरल झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. परंतु महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रातील परीक्षेकरिता 10.30 वाजे पर्यंत परीक्षेच्या दलनात परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे या वेळेनंतर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नसतो. त्यामुळे गणित विषयाचा पेपर कोणत्याही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नसल्याचे आढळून आलेले आहे. असे शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.

दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर; लगेच पहा टाईम टेबल 

 

राज्य शिक्षण मंडळाने खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला:

कोणत्याही ठिकाणी विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका पोहोचल्याचे आढळून आल्यामुळे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार नाही. राज्यात कोणतेही विद्यार्थ्यांना पेपर फुटीच्या घटनेमुळे पेपर मिळाल्याची घटना समोर न आल्यामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेकरिता 10 मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार; महत्वाचा निर्णय; विद्यार्थ्यांना होईल फायदा!

अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल:

पेपर फुटीच्या वायरल झालेल्या या बातम्या मुळे अज्ञाता विरोधात सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे आता गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार नसून बारावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी या संदर्भात नोंद घ्यावी.

गरिबांच्या विद्यार्थ्यांना मोफत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेश मिळणार; असा करा फ्री ऍडमिशन साठी अर्ज

अशाप्रकारे पेपर फुटीच्या घटना संदर्भात राज्य शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थ्यांकरिता महत्त्वपूर्ण असलेली ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!