शेतकरी बांधवांनो कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सध्या खूप बिकट परिस्थिती सुरू आहे. कांद्याचे दर सातत्याने कमी होत असल्यामुळे कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जगणं मुश्किल होत आहे. कांदा पीक उगवण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केला आणि हातात केवळ एक रुपया मिळत आहे. त्यामुळे कांदा या शेतकऱ्यांची असलेली ही अवस्था आज जगासमोर येत आहे. यापूर्वी सुद्धा अनेक कांद्यासंदर्भात घटना घडल्या तशीच बीड जिल्ह्यात सुद्धा एका शेतकऱ्याने एक लाख रुपये खर्च करून कांद्याचे पीक घेतले आणि केवळ एक त्याला मिळाला.
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे भाव दररोज कमी होत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा या पिकाचे उत्पादन घेतले होते किंवा जे शेतकरी केवळ कांदा या पिकावर निर्भर आहेत, अशा शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यादी एका शेतकऱ्याने 512 किलो कांदा विकून केवळ त्याला दोन रुपयाचा चेक मिळाला होता. अशाच प्रकारची घटना बीड जिल्ह्यात सुद्धा घडलेली आहे. जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला खूप सारे कांदे विकून केवळ एक रुपया मिळालेला आहे.
जगभरात कांद्याला मोठी मागणी असताना सुद्धा राज्यात कांदा या पिकाला खूप कमी दर मिळत आहे. राज्यामध्ये कांद्याला एक रुपया प्रति किलो ते दोन रुपये प्रति किलो एवढा कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत असून शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक उत्पादन करण्यासाठी केलेला खर्च सुद्धा निघत नाही. शेतकऱ्यांनी खर्च केलेला तर सोडूनच द्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कांदा विकण्यासाठी बाजार समितीमध्ये आणण्यासाठी केलेला वाहतुकीचा खर्च सुद्धा कांद्यामधून मिळणाऱ्या पैशांमधून निघत नाही आहे
कांद्याच्या 17 गोण्या विकून मिळाला फक्त 1 रुपया:
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बावी या गावातील नामदेव पंढरीनाथ लटपटे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकराच्या शेतामध्ये कांदा या पिकाची लागवड करून यावर्षी कांदा पिकाचे उत्पादन घेतलेले होते. लटपटे या शेतकऱ्याने पिकवलेला कांदा 8 क्विंटल 44 किलो भरला, हा कांदा या शेतकऱ्यांनी अहमदनगर येथील मार्केटमध्ये नेऊन विकला. परंतु अतिशय कमी बाजार भाव मिळाल्यामुळे तसेच सर्व खर्च वजा करून त्या शेतकऱ्याला केवळ एक रुपया मिळालेला आहे.
बीड जिल्ह्यातील नामदेव पंढरीनाथ लटपटे या शेतकऱ्यांना त्यांच्या तीन एकराच्या शेतामध्ये कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी जवळपास एक लाख रुपये इतका खर्च आलेला होता. परंतु त्यांनी केलेला एवढा खर्च संपूर्णतः वाया गेलेला असून त्यांना केवळ एक रुपया एवढेच उत्पन्न मिळू शकलेले आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत:
बीड जिल्ह्यातील नामदेव पंढरीनाथ लटपटे या शेतकऱ्यांना एक लाख रुपये खर्च करून एक रुपया मिळाल्यानंतर त्यांनी त्यावर असे म्हटले आहे की, कांद्याचे एका गोणीसाठी त्या शेतकऱ्याला शंभर रुपये खर्च आला आणि कांद्याच्या 17 गोण्या विकून केवळ एक रुपया मिळाला. हा शेतकरी त्याच्या कांद्याचे विक्रीसाठी दोन दिवस बाजार समितीमध्ये राहिला आणि त्या ठिकाणी जेवायलाही मिळालं नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
एक लाख रुपये खर्च करून एक रुपयात जीवन कसं जगायचं?
या शेतकऱ्यांनी त्याच्या तीन एकराच्या शेतामध्ये कांदा पिकाची लागवड केलेली होती, कांदा पिकाच्या लागवडीकरिता त्या शेतकऱ्यांनी दहा किलो कांद्याचे बी अठरा हजार रुपयांची आणले होते. या शेतकऱ्याला तीन एकरामध्ये कांद्याच्या लागवडी करिता बारा हजार रुपये प्रति एकर इतका खर्च आला होता. कांदा लागवडीपासून तर कांदा विक्रीपर्यंत या शेतकऱ्याला संपूर्ण खर्च मिळून एक लाख रुपये खर्च आला होता. एक लाख रुपये खर्च झाल्यामुळे त्या शेतकऱ्याला कांदा या पिकाच्या विक्रीतून किमान पाच ते सहा लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा होती परंतु त्याला केवळ एक रुपयावर समाधान मानावे लागत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांवर आस्मानी संकट! पुढील 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता; या ठिकाणी पडेल जोरदार पाऊस
अशाप्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक प्रकारच्या समस्या आहेत तसेच अतिशय कमी बाजार भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी बाजारामध्ये आणण्याकरिता लागणारा खर्च सुद्धा निघत नाही आहे.