या शेतकऱ्याने कमालच केली! सांगलीतील शेतकऱ्याने पिकवला तब्बल 800 ग्रॅम वजन असलेला कांदा; जाणून घ्या पाऊण किलो वजनाचा कांदा कसा पिकवला

शेतकरी बांधवांनो तुम्ही आत्तापर्यंत 50 ते 100 ग्रॅम वजनाचा कांदा पाहिलेला असेल, परंतु सांगलीतील एका शेतकऱ्याने चक्क 800 ग्राम वजनाचा kanda पिकवलेला आहे. या शेतकऱ्याचे सर्व ठिकाणी कौतुक होत असून सर्वत्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मोठी चर्चा सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील ब्रह्मणा येथील या शेतकऱ्याने पाऊण किलोच्या पिकवलेल्या कांद्यामुळे सर्वच विक्रम मोडले गेले आहे. सांगली जिल्ह्यातील या शेतकऱ्याच्या कांदा उत्पन्नाबद्दल माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

 

सध्या कांद्याचा चर्चा तसेच कांद्याचा विषय संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाजत आहे. यापूर्वी एका जिल्ह्यातील शेतकऱ्याला 512 किलो इतक्या कांद्याच्या मोबदल्यात केवळ दोन रुपयाचा चेक मिळाला होता. त्यामुळे तो शेतकरी सर्वत्र चर्चेत राहिला होता. आणि कांदा संदर्भातच सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्यांनी पाऊण किलोचा म्हणजेच 800 ग्रामचा कांदा पिकवल्यामुळे या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

शेतकऱ्यांनी पिकवले 800 ग्रॅम चे कांदे

शेतकरी बांधवांना सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मणा या गावातील हनुमंतराव शिरगावे या शेतकऱ्याने त्यांच्या उसात आंतरपीक म्हणून कांदा या पिकाची लागवड केली होती. या शेतकऱ्यांनी उसाच्या पिकात कांद्याची आंतरपीक पद्धतीने लागवड केल्यामुळे उसाबरोबरच त्या कांद्या या पिकाला सुद्धा मुबलक प्रमाणात खत पाणी मिळत होते. त्यानंतर उसाच्या भरणीसाठी या शेतकऱ्यांनी kanda पीक काढायला सुरुवात केली असताना त्याच्या शेतात सुरुवातीला दहा ते बारा साडेसातशे ते आठशे ग्रॅम वजन असणारे कांदे निघाले.

 

त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या उसाच्या आंतर पिकातील कांदा हा सरसकट वजनदार निघू लागला. या शेतकऱ्यांसाठी ही बाब अनोखी होती. कारण की आतापर्यंत एवढे वजनदार कांदे कोणत्या शेतकऱ्यांनी पिकवले नव्हते. त्यामुळे प्रत्येक कांद्याचे वजन केले असता तो कांदा 800 ग्राम इतक्या वजनापर्यंत वजनदार भरत होता.

 

या शेतकऱ्याचे उत्पन्न झाले दुप्पट

सांगली जिल्ह्यातील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्यांनी त्यांच्या उसामध्ये आंतरपीक पद्धतीने घेतलेल्या कांदा या पिकाच्या लागवडीमध्ये कांद्याच्या वजनामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आढळून आल्यामुळे त्यांना मिळणारा कांदा हा कितीतरी पटीने जास्त वजनदार भरला. त्यामुळे शेतकऱ्याला मिळणारे उत्पन्न अनेक पटीने वाढले. अशाप्रकारे प्रत्येक शेतकऱ्याचे झाल्यास नक्कीच त्यांची देखील उत्पन्न दुप्पट होईल.

हरभरा हमीभाव खरेदी करिता ऑनलाईन नोंदणी सुरू; शेतकऱ्यांनो तुमचा हरभरा किमान आधारभूत किंमत ने (5330 रू प्रति क्विंटल ने) शासनाला विका

 

अशाप्रकारे केली कांदा पिकाची शेती:

हनुमंत शिरगावे या शेतकऱ्यांनी कांदा या पिकाचा यशस्वी प्रयोग करून दाखवल्यामुळे त्यांची सर्व तर चर्चा होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र या शेतकऱ्याने कशा पद्धतीने कांदा या पिकाची शेती केली हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. या शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याचा फड पाहण्यासाठी अनेक गावांमधून लोक येत आहेत.

बांधकाम कामगार पेट्या वाटप सुरू; बांधकाम कामगार सेफ्टी किट मिळवण्यासाठी असा करा अर्ज

या शेतकऱ्यांनी कांदा या पिकाची लागवड करण्यासाठी नेहमीप्रमाणे बाजारपेठेतील कांद्याचे रोप आणले होते. तसेच उसाच्या पिकामध्ये आंतरपीक पद्धतीने त्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती. तसेच दोन वेळा उसासोबतच कांद्याची आळवणी केली होती. सिव्हिडची तसेच ह्युमिक, फुलविक ची दोन वेळा फवारणी सुद्धा या शेतकऱ्यांनी केली होती.

हे नक्की वाचा: शेतकऱ्याला दहा पोते कांदा विकून फक्त 2 रुपयांचा चेक मिळाला; या कांदा उत्पादक शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा

या शेतकऱ्यांनी ऊस या पिकासाठी केलेला प्रयोग कांदा या पिकासाठी लागू पडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला कांदा या पिकांमधून दणदणीत उत्पन्न मिळालेले आहे. परिणामी उत्पन्नात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात देखील अनेक पटीने वाढ झालेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!