राज्यातील कर्मचाऱ्यांना का हवी आहे जुनी पेन्शन योजना? नेमकी जुनी पेन्शन योजना काय आहे? | Old Pension Scheme Details

राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी राज्य कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलने करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला जुनी पेन्शन योजना काय आहे? या जुन्या पेन्शन योजनेची मागणी कर्मचारी का करत आहे. जुन्या पेन्शन योजनेत आणि नवीन पेन्शन योजनेत काय फरक आहे आणि जर जुनी पेन्शन योजना लागू झाली तर त्याचा कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार याची संपूर्ण माहिती सर्वसामान्य व्यक्तीला जाणून घ्यायची आहे. आजच्या या लेखात आपण जुन्या पेन्शन योजने संदर्भात विस्तृत माहिती Old Pension Scheme Information in Marathi जाणून घेणार आहोत.

 

 

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी 19 लाख कर्मचारी संपावर:

राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जवळपास 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. अनेक कर्मचारी संपावर गेली असल्यामुळे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात यंत्रणेवर होत आहे. या कर्मचाऱ्यांमुळे अनेक कामे प्रलंबित होत आहेत तसेच अनेक कामे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आंदोलनावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली होती परंतु ती बैठक निष्फळ ठरल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुढे सुरूच आहे. आपण जाणून घेत आहोत Old Pension Scheme Information Marathi संदर्भात विस्तृत माहिती.

 

जुन्या पेन्शन योजनेची मागणी प्रामुख्याने निमसरकारी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर राज्य सरकारी कर्मचारी करत आहेत. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची Juni pension yojana लागू करण्याची मागणी सरकार दरबारी केलेली आहे. परंतु शासनाने जुन्या पेन्शन योजने संदर्भात त्रिस्तरीय कमिटी तयार केलेली असून ती कमिटी तीन महिन्यांमध्ये त्यांचा अहवाल सादर करणार आहे.

 

 

जुनी पेन्शन योजना काय आहे? What is Old Pension Scheme?

जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय फायद्याचे ठरणारी पेन्शन योजना आहे. या जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराची निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळत असते. उदाहरणाच्या माध्यमातून समजायचे झाल्यास जर एखाद्या कर्मचाऱ्याला 80 हजार रुपये पगार असेल तर त्या कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळायची.

 

 

नवीन पेन्शन योजना काय आहे? What is New Pension Scheme

जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामध्ये बराच फरक असून नवीन पेन्शन योजनेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराची केवळ 2.5 टक्के रक्कम ही पेन्शन मधून मिळते. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला तीन हजार रुपये पगार हा त्याच्या निवृत्तीच्या वेळी असल्यास त्याला 2700 रुपये पेन्शन म्हणून मिळते.

 

वडिलांना मुलांच्या परवानगी शिवाय जमीन विकता येते का? जाणून घ्या जमीन विक्री संदर्भात कायदा; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय 

 

जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेतील फरक Difference between Old Pension Scheme and New Pension Scheme

जुन्या पेन्शन योजनेमध्ये नवीन पेन्शन योजनेच्या तुलनेत जास्त पेन्शन मिळते. जुन्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून पगारामधून कपाट करण्यात येत नाही परंतु नवीन पेन्शन योजनेमध्ये पगारांमधून कपात करण्यात येते. ग्रॅज्युटी तसेच जीपीएफ व महागाई भत्ता आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर वारसाला पेन्शन अशा प्रकारच्या विविध सुविधा या जुन्या पेन्शनधारकांनाच मिळतात. तर नव्या पेन्शन योजनेमध्ये वरील प्रकारच्या सर्व सवलती बंद करण्यात आलेले आहे.

 

शहरात घर बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 4752 घरांसाठी मार्च पासून अर्ज सुरु होणार

 

भारतात कोणत्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे?

मित्रांनो आपल्या भारत देशात पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे त्यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल व राज्यस्थान इत्यादी राज्यांचा समावेश आहे. तर हरियाणा, गुजरात व महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे.

जमीन तुमची आहे का ते सिद्ध करण्यासाठी हे 4 पुरावे आवश्यक ; तुमच्याजवळ आहेत का जमिनीचे हे पुरावे, संपूर्ण माहिती पहा

Leave a Comment

error: Content is protected !!