शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राबविण्यात आलेली आहे. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली होती. याच कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 50000 प्रोत्साहन अनुदान देण्यात येत असून महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नवीन 50000 अनुदान योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आता या Niyamit Karj Mafi 4th List मध्ये नाव असणाऱ्या शेतकरी बांधवांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन म्हणून वितरित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत प्रकाशित झालेल्या होत्या परंतु अनेक शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत होते तसेच ते पात्र असून सुद्धा त्यांना प्रोत्साहन रकमेचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी नवीन यादीच्या प्रतीक्षेत होते. सध्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सरकारला प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावर उत्तर देताना शासनाने म्हटले होते की नवीन यादी प्रकाशित करून शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात येईल त्याचबरोबर यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 31 मार्चपूर्वी 50000 Anudan रक्कम जमा करण्यात येईल.
त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आता नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची नवीन चौथी यादी जाहीर करण्यात आलेली असून यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. कारण की येत्या 31 मार्च पूर्वी यादीत नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे.
50 हजार अनुदान योजनेची यादी कशी पहायची? 50000 Anudan 4th List
शेतकरी मित्रांनो कर्जमुक्ती योजनेच्या पन्नास हजार अनुदानाची यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर ती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून सीएससी लोगिन करून पाहता येईल. किंवा ही Niyamit Karj Mafi 4th List तुम्हाला तुमच्या जवळील सीएससी केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर पाहायला मिळेल.
तुमच्या जिल्ह्याची 50 हजार अनुदान योजनेची चौथी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलेले असेल तर तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन देखील त्याबद्दल विचारू शकतात.
सर्व जिल्ह्यांची 50 हजार अनुदान योजनेची 4ठी यादी येथे क्लिक करून पहा
50000 अनुदानाच्या यादीत नाव आले तर हे काम लगेच करा
जर तुम्हाला 31 मार्च 2023 पूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्हाला यादीतील नाव असल्याबाबत तुमचा विशिष्ट क्रमांक घेऊन जवळच्या सीएसटी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जे शेतकरी आधार प्रमाणिकरण पूर्ण करतील अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50000 प्रोत्साहन जमा करण्यात येणार आहे.
नियमित कर्जमाफी 50000 अनुदान यादी येथे पहा