शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नॅनो डी.ए.पी ला केंद्राची मंजूरी; आता डीएपी अर्ध्या किमतीत उपलब्ध होणार | Nano Dap Launch

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून देशातील सर्व शेतकरी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांनो शेती करण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी आधुनिकीकरणामुळे अनेक बदल होत असतात. आपण शेती करताना जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर करतो. परंतु रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमीन प्रदूषित होते. त्यामुळे केंद्र शासनाने डीएपी या खतामध्ये लिक्विड स्वरूपातील असणारे नॅनो डीएपी ला मंजुरी दिलेली आहे. या Nano DAP बद्दल important news for farmer या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो आजकाल मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांना शेतीवर येणारा खर्च हा अनेक पटीने वाढलेला आहे. fertilizers चे भाव देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना एकंदरीत शेतीवर येणारा खर्च उत्पादनाच्या तुलनेत परवडणार नाही. तसेच शेतकऱ्यांना शेत माल पिकवता येतो परंतु तो योग्य दरामध्ये विकता येत नाही, कारण की शेतकऱ्यावर कर्जाचे देणे असते. या सर्व परिस्थितीमध्ये देशातील शेतकरी हा दिवसेंदिवस चक्रव्यू मध्ये फसत असून त्याची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे.

 

 

नॅनो डीएपी ला केंद्राची मंजुरी Nano DAP Latest News

शेतकऱ्यांकडे अतिशय खुशखबर प्राप्त झालेली असून केंद्र शासनाने राजपत्राच्या माध्यमातून अधिसूचना काढून नॅनो डीएपी ला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता नॅनो युरियाप्रमाणे शेतकऱ्यांना लिक्विड स्वरूपात नॅनो डीएपी देखील मिळणार आहे.

देशाचे केंद्रीय खते व रसायन मंत्री यांनी याबाबत ट्विट केलेले असून त्यांच्या ट्विट ला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी रितूट करून सर्व देशातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केलेले आहे.

 

यापूर्वी झाला होता नॅनो युरिया लॉन्च:

यापूर्वी शेतकऱ्यांना वापरण्यात येणाऱ्या युरिया या खतासाठी नॅनो युरिया लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया हे खत टाकण्यासाठी आता जमिनीमध्ये टाकण्याची आवश्यकता नसून त्याचा फवारा पिकांवर करता येत आहे. तसेच या नॅनो युरियामुळे खर्च सुद्धा खूप कमी झालेला आहे. अशातच असा केंद्र सरकारने नॅनो युरियाप्रमाणे नॅनो डीपीला मंजुरी दिलेली असून आता शेतकऱ्यांना डीएपी हे खत स्वस्तात आणि लिक्विड स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

 

शेतकऱ्यांसाठी नॅनो डीएपी का आवश्यक आहे? Why is Nano DAP essential for farmers?

शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या मार्फत वापरण्यात येणारे जास्तीत जास्त खत म्हणजे डीएपी हे होय. डीएपी हे एक चांगल्या प्रकारचे उच्च दर्जाचे रासायनिक खत असून जास्तीत जास्त शेतकरी या खताचा वापर करतात. अनेक वेळा आपल्याला इतर देशांमधून डीएपी या खताची आयात मोठ्या प्रमाणात करावी लागते. तसेच रासायनिक खताचा जास्तीत जास्त जमिनीमध्ये वापर केल्यास तुमच्या जमिनीचा पोत बिघडतो, परिणामी काही वर्षांनी ती जमीन नापीक होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना Nano DAP ची फार आवश्यकता होती.

 

या शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विम्याचे 244 कोटी रुपये वितरित; शासन निर्णय जाहीर; लगेच पहा पात्र शेतकऱ्यांची नावे 

 

नॅनो डीएपी चे शेतकऱ्यांना होणारे फायदे Benefits of Nano DAP to Farmers

शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच रासायनिक खतांचा जास्त वापर जमिनीमध्ये केल्यामुळे प्रदूषणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येणाऱ्या प्रत्येक हंगामामध्ये रासायनिक खतांच्या किमती वाढत असल्यामुळे तसेच शेतकऱ्यांना हवा त्या प्रमाणात भाव न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही आहे. त्यामुळे नॅनो स्वरूपात डीएपी वापरल्यामुळे शेतकऱ्यांना डीएपी खरेदी करण्याकरिता अतिशय कमी पैसे द्यावे लागतील. तसेच नॅनो डीएपी शेतकऱ्यांना जमिनीमध्ये टाकण्याची आवश्यकता नसून त्याची फवारणी शेतामध्ये करावी लागेल जेणेकरून ते खत मातीत न मिसळता थेट पिकांमध्ये फवारले जाईल. यामुळे जमिनीचा पोत सुधारेल तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

या जिल्ह्यामध्ये रेशन धारकांना मिळत आहे रेशन ऐवजी पैसे; लगेच हा अर्ज भरा आणि मिळवा रेशन ऐवजी 9000 रुपये

 

या कंपनीने नॅनो डीएपी चा शोध लावला:

अनेक वर्षापासून देशभरातील शास्त्रज्ञ डीपीचे नॅनो स्वरूपात रूपांतरित करण्याचा उपाय शोधत होते. यापूर्वी इफको या कंपनीने नॅनो एरिया देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला होता. आता याच इफको कंपनीने Nano DAP बनवलेले असून केंद्र शासनाने देखील नॅनो डीएपी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना Nano Urea प्रमाणे Nano DAP उपलब्ध होणार आहे.

रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट! जाणून घ्या रासायनिक खतांचे नवीन दर

Leave a Comment

error: Content is protected !!