अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; नमो शेतकरी योजना सुरू; आता शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार ऐवजी 12 हजार मिळणार | Namo Shetkari Yojana Maharashtra

शेतकरी बांधवांनो 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाचे सन 2023 24 साठी चे अर्थसंकल्प सादर झालेला आहे. या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक प्रकारच्या नवीन योजनांना सुरुवात करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी अनेक सोयी सुविधा सहजरीत्या उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्ये शासनाने शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र सुरू केलेली आहे. आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना Namo Shetkari Yojana अंतर्गत दोन्ही योजनांचे एकत्रित पैसे मिळवून वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहे.

नुकत्याच सादर झालेल्या या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये या नमो शेतकरी योजने करिता अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. ज्याच्या माध्यमातून ही namo shetkari yojana Maharashtra राबवण्यासाठी पैसा वितरित करण्यात येणार असून आता शेतकरी बांधवांना दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे आता सन्मान निधी योजनेच्या मानधनाऐवजी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना सुरू झाल्यामुळे सहा हजार रुपये ऐवजी 12 हजार रुपये राशी मिळणार आहे.

 

नमो शेतकरी योजनेला सुरुवात:

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे राज्य शासनाच्या मार्फत सहा हजार रुपये वार्षिक अर्थसाह्य देणारी योजना सुरू करण्याची घोषणा यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेली होती. आणि आता या योजनेला राज्यात राबवण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ही namo shetkari yojana 2023 राज्यात राबवण्यासाठी संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे आता जे शेतकरी बांधव केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजेच ज्यांना दरवर्षी सहा हजार रुपये रक्कम मिळत आहे अशा शेतकऱ्यांना आता वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहे.

 

शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 वितरणाचा लवकर शासन निर्णय जाहीर होणार:

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र अंतर्गत मार्गदर्शक सूचना सहित योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच शासन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. योजनेचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू होणार आहे. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला जे पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहे.

 

 

नमो शेतकरी योजना अंतर्गत 12 हजार रुपये कोणाला मिळणार?Who will get 12 thousand rupees under Namo Shetkari Yojana?

शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाने पी एम किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली असून पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करून Namo Shetkari Yojana अंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत काही शेतकरी अपात्र ठरविण्यात आलेल्या असून तसेच नवीन नोंदणी अनेक शेतकऱ्यांनी केलेली नसल्यामुळे नवीन मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर नवीन अर्जदारांना अर्ज करता येणार का, हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे 58 कोटी रुपये जमा

शेतकरी बांधवांना अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात महत्त्वपूर्ण अशी नमो शेतकरी योजना 2023 ही महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सुरू करण्यात येत असून या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच आर्थिक मदत सुद्धा होणार आहे.

 

रेशन कार्डधारकांना धान्य ऐवजी पैसे वाटप करण्याचा शासन निर्णय जाहीर; रेशन ऐवजी प्रत्येकी 9000 रु मिळवण्यासाठी अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा

Leave a Comment

error: Content is protected !!