म्हाडा अंतर्गत घर मिळवून इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी प्राप्त झालेली आहे. म्हाडा अंतर्गत 4752 घरांची लॉटरी निघणार आहे. म्हाडा अंतर्गत कोकण विभागामध्ये नवीन घरांची लॉटरी सुरू करण्यात येत असून नागरिकांना घर मिळवण्यासाठी आठ मार्चपासून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे Mhada Lottery अंतर्गत शहरांमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. या योजनेअंतर्गत किती घरे मिळणार तसेच कोणत्या भागात मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
म्हाडाच्या कोकण विभागात नवीन घरांची लॉटरी काढण्यात येत आहे. त्या MHADA Lottery 2023 Apply कधी व कसे करायचे या संदर्भात माहिती तुम्हाला असायला हवी. कोकण विभागामध्ये घर मिळवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी mhada online सोडतीच्या माध्यमातून नागरिकांना घर मिळवून देणार आहे. म्हाडा अंतर्गत कोकण विभागात एकूण 4752 घरांसाठी ऑनलाईन सोडतीच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात येणार असून 8 मार्च 2023 या तारखेपासून नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे.
Mhada अंतर्गत वेळोवेळी पुणे तसेच मुंबई व औरंगाबाद तसेच कोकण विभाग अशा विविध ठिकाणी तसेच राज्यातील इतरही ठिकाणी म्हाडा प्रकल्पा अंतर्गत नागरिकांना कमी दरात घर उपलब्ध करून देण्यात येत असते. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांकरिता Mhada Lottery अंतर्गत अर्ज सुरू झाल्यानंतर अर्जदारांनी अर्ज करायचा असतो.
MHADA Konkan Lottery 2023 Maharashtra अंतर्गत नवीन संगणकीय बदलांसह 8 मार्चपासून नागरिकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोकण विभागात घर घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झालेली आहे.
म्हाडा अंतर्गत मिळणाऱ्या घरांची संख्या
नागरिकांना MHADA Konkan Lottery अंतर्गत एकूण 4752 घरे वाटप करण्यात येणार असून त्यापैकी 984 घरे ही पंतप्रधान आवास योजनेचे असतील तर 20 टक्के इतर योजनेअंतर्गत आणि उर्वरित घरे म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत समाविष्ट असतील. असे मिळून 4 हजार 752 घरांच्या ऑनलाईन सोडत करिता अर्ज मागविण्यात येणार आहे.
म्हाडा अंतर्गत घर कसे मिळवायचे?
म्हाडा योजनेअंतर्गत जर तुम्हाला घर मिळवायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन सोडत सुरू झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असतो. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार या योजनेअंतर्गत लॉटरी पद्धतीने निवड करून लाभार्थ्यांना घराचे वितरण करण्यात येते.
म्हाडा अंतर्गत घर मिळण्यासाठी अर्ज केव्हा करायचा? When to apply for housing under MHADA?
म्हाडा योजनेअंतर्गत कोकण विभागामध्ये घर मिळवण्यासाठी तुम्हाला 8 मार्च 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 10 एप्रिल पर्यंत अर्जदारांना अर्ज करता येणार आहे. 12 एप्रिल पर्यंत अर्जदारांना अनामत रक्कम याचा भरणा करता येईल. 28 एप्रिल पर्यंत योजने संदर्भात हरकती मांडता येईल. तर 10 मे 2023 रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात घरांची लॉटरी काढण्यात येईल. आठ मार्चपासून लाभार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
त्यामुळे अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती वाचून घ्यावी नंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
ओबीसींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना; नवीन घरकुल योजना सुरू