विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांनी भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण डाक सेवक अंतर्गत अर्ज केलेले होते, अशा उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती 2023 चा निकाल आज जाहीर झालेला आहे. पोस्ट ऑफिस भरती 2023 अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे. अशा उमेदवारांना आता त्यांच डॉक्युमेंट वेरिफिकेशन कंप्लिट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सुद्धा अर्ज केलेला असेल तर तुम्हाला तुमची निवड या भरती अंतर्गत झालेली आहे का? ते चेक करता येते. त्याचबरोबर या लेखात आम्ही तुम्हाला निवड झालेल्या उमेदवारांची Post Office Result 2023 पीडीएफ यादी उपलब्ध करून देणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो India Post GDS Result Maharashtra Circle हा नुकताच जाहीर झालेला आहे. भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती 2023 निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जेव्हा उमेदवारांनी अर्ज केलेले होते अशा उमेदवारांनी त्यांचा रोल नंबर त्या पीडीएफ मध्ये पाहून त्यांची निवड या भरती अंतर्गत झालेली आहे का, ते चेक करायचा आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची पीडीएफ जाहीर
ग्रामीण डाक सेवक भरती अंतर्गत महाराष्ट्र सर्कल करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले होते त्या उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारावर म्हणजेच दहावीच्या टक्केवारीनुसार निवड करण्यात आलेली असून निवड झालेल्या उमेदवारांची पीडीएफ यादी तयार करून ती अधिकृत साइटवर अपलोड करण्यात आलेली आहे. या लेखात आम्ही तुम्हाला निवड झालेल्या उमेदवारांची पीडीएफ यादी उपलब्ध करून दिलेली आहे.
पोस्ट ऑफिस भरती 2023 निकाल ऑनलाईन कसा पाहायचा?
पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत जर तुम्ही सुद्धा महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये अर्ज केलेला असेल तर तुम्हाला खालील पद्धतीनुसार तुमचा ऑनलाईन पद्धतीने Post Office Results 2023 Maharashtra पाहता येतो.
1. सर्वप्रथम भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. निकाल पाहण्याची अधिकृत वेबसाईट – https://indiapostgdsonline.cept.gov.in/
3. त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट ऑप्शन मध्ये महाराष्ट्र ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
4. आता तुम्हाला शॉर्टलिस्ट कॅंडिडेट या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
5. आता या यादीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ती यादी डाऊनलोड झालेली आहे.
6. पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला वरच्या बाजूला एक सर्च नावाचा ऑप्शन दिसेल त्यामुळे तुम्ही तुमचा फोन नंबर किंवा डायरेक्टली नाव टाकून तुमचं निकाल पाहू शकतात.
7. किंवा जर तुम्हाला तुमचा निकाल पाहायचा असेल तर तुम्ही संपूर्ण पीडीएफ पाहून देखील सर्च करून तुमचा निकाल चेक करू शकतात.
इंडिया पोस्ट महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती 2023 निकाल येथे पहा
निवड झालेली असेल तर पुढील प्रक्रिया काय?
जर तुमची सुद्धा Gramin Dak Sevak Recruitment 2023 अंतर्गत निवड झालेली असेल तर आता तुम्हाला पुढील टप्प्यांमध्ये कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला कागदपत्र पडताळणी करण्यासाठीची अधिकृत तारीख आणि वेळ नंतर जाहीर करून देण्यात येईल.