शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता केवळ 1 रुपया भरून पिक विमा काढता येणार; अर्थसंकल्पात तरतूद, महत्वाचा निर्णय: Maharashtra Budget Pik Vima Update

शेतकरी बांधवांना 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट जाहीर झालेला आहे. सन 2023-24 करिता जाहीर झालेल्या या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभपणे मिळवता यावा यासाठी सुद्धा शासन प्रयत्न करून त्यासाठी maharashtra budget 2023-24 मध्ये आर्थिक तरतूद करत आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या पिक विमा योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना पैसे भरण्याची आवश्यकता नसून केवळ 1 रुपयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांचा Pik Vima काढता येणार आहे.

 

त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांचा pik vima उतरवण्यासाठी यापूर्वी भरावी लागणारी रक्कम ही केवळ आता एक रुपया असणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या कितीही क्षेत्राचा pik vima maharashtra काढायचा असल्यास केवळ एक रुपयाच्या माध्यमातून शेतकरी पूर्ण पीक विम्याचा लाभ मिळू शकणार आहे.

 

 

शेतकऱ्यांना भरावयाची रक्कम सरकार भरणार

शेतकरी बांधवांना दरवेळेस आपल्याला पिक विमा काढत असताना आपल्या वाटेवर असणारी पिक विम्याची रक्कम भरायची असते. त्यानंतर महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार त्यांच्या वाटेवर असणारी रक्कम विमा कंपनीला भरत असते. परंतु शेतकऱ्यांना भरावयाची हत्याची रक्कम भरणे शक्य नसल्यामुळे तसेच शेतकऱ्यांना जर विमा भेटला नाही तर ती रक्कम पूर्णतः वाया जात असल्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आता केवळ एक रुपयांमध्ये pik vima काढता येणार आहे.

 

 

शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा

शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा उतरवणे अत्यंत महत्त्वाचे होते. दरवर्षी नैसर्गिक आपत्ती येत आहेत तसेच पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिसकाटून घेतल्या जात आहे. त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांना केवळ पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळत असते. त्यामुळे crop insurance हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो कारण की शेतकऱ्यांची शेतीवर पोट असते. आणि जर पिकत नष्ट झाले तर शेतकऱ्यांना कोण जगवणारा हा प्रश्न निर्माण होतो.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजार अनुदान 31 मार्च पूर्वी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात; सविस्तर माहिती पहा

त्याचप्रमाणे दिवसेंदिवस दरवर्षी पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावयाचा पिक विम्याची हप्त्याची रक्कम वाढत जात होती त्यामुळे शेतकऱ्यांना एवढी मोठी रक्कम भरणे शक्य होत नव्हते. परंतु आता उर्वरित रक्कम शासन भरणार असल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा उतरवता येणार आहे.

 

या शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विम्याचे 244 कोटी रुपये वितरित; शासन निर्णय जाहीर; लगेच पहा पात्र शेतकऱ्यांची नावे

 

येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पिक विमा काढता येणार:

महाराष्ट्र शासनाने या योजने संदर्भात महत्वपूर्ण अशी तरतूद केलेली असून 8 मार्च 2023 रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये या योजने करिता आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामा मध्ये शेतकरी बांधवांना त्यांच्या शेती पिकांचा peek vima काढण्यासाठी आता शेतकऱ्यांना भरावयाची विमा हप्त्याची रक्कम भरायची आवश्यकता नसून केवळ एक रुपयाच्या माध्यमातून पिक विमा काढता येणार आहे.

 

रब्बी हंगामाच्या पिक विम्यासाठी 136 कोटी रुपये वितरित; या शेतकऱ्यांना मिळेल पिक विमा; आत्ताच नाव चेक करा

Leave a Comment

error: Content is protected !!