फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र अर्ज सुरू; या योजने अंतर्गत टॅबलेट व 6GB डेटा मोफत | Mahajyoti Free Tablet Yojana 2023

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सारथी तसेच महाज्योती आणि बार्टी या स्वायत्त संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. या वरील तीन संस्था नेहमीच विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या शैक्षणिक बाबींसाठी वेळोवेळी प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध करून देते. फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र ही महाज्योती या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. आजच्या या लेखात आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजने संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. योजनेअंतर्गत फ्री टॅबलेट मिळण्यासाठी कोण पात्र आहेत, या Free Tablet Yojana 2023 करिता अर्ज कसा करायचा या संदर्भात विस्तृत माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

 

फ्री टॅबलेट योजना काय आहे? What is Mahajyoti Free Tablet Yojana?

विद्यार्थी मित्रांनो महा ज्योती या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील MHT-CET/JEE / NEET करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पूर्व प्रशिक्षण मिळवण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. Mahajyoti या संस्थे मार्फत वरील परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणारे हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे Mahajyoti Free Tablet Yojana अंतर्गत ऑनलाईन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेमार्फत मोफत टॅबलेट व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येत आहे.

 

फ्री टॅबलेट कोण मिळवू शकतो?

महा ज्योति संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या free tablet scheme maharashtra अंतर्गत MHT-CET/JEE / NEET ची तयारी करणारे महाराष्ट्र राज्यातील विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती व विमुक्त जमाती इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थी लाभ मिळवू शकतात.

 

महाज्योती फ्री टॅबलेट योजने करिता पात्रता: Eligibility Criteria for Free Tablet Yojana

महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या फ्री टॅबलेट योजने अंतर्गत खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

1. अर्जदार हा आपल्या महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

2. अर्जदार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.

3. अर्जदार हा विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी कोणत्याही प्रवर्गातील असल्यास पात्र आहे.

4. सन 2023 मध्ये जे विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत म्हणजेच जे विद्यार्थी 2023 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण असे विद्यार्थी पात्र आहेत.

5. अर्ज करणारा अर्जदार दहावीनंतर विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन करनारा असावा.

 

मोफत टॅबलेट योजने करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Free Tablet Yojana?

महाज्योती संस्थेमार्फत मोफत टॅबलेट मिळविणे करिता तुमच्याकडे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड

2. वर्ग 9वी ची गुणपत्रिका

3. वर्ग दहावीचे परीक्षेचे ओळखपत्र

4. कास्ट सर्टिफिकेट

5. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट

6. रहिवासी दाखला

मोफत टॅबलेट मिळविण्यासाठी येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करा

 

महा ज्योती फ्री टॅबलेट मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा? Mahajyoti Free Tablet Yojana Registration Process

महा ज्योतिसंस्थेमार्फत वरील प्रशिक्षण आणि मोफत टॅबलेट करिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज सोबत तुम्हाला कागदपत्रे त्यांच्यावर स्वाक्षरी करून व्यवस्थितपणे स्कॅन करून अपलोड करायची आहे. तुम्हाला Mahajyoti Free Tablet Yojana Registration हे www.mahajyoti.org.in या वेबसाईट वरून करायचे आहे.

फ्री टॅबलेट आणि फ्री नेट मिळविण्याचा ऑनलाईन अर्ज येथे करा

Leave a Comment

error: Content is protected !!