सर्वसामान्य नागरिकांना होळीपूर्वीच मोठा महागाईचा झटका; एलपीजी गॅस सिलेंडर च्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या सध्याचे दर | LPG Rate Increase

होळी या सणापूर्वी देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसलेला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू यांच्या किमती सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. बुधवारी एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ होऊन घरगुती एलपीजी सिलेंडर 1103 रुपयांवर पोहोचला आहे. सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ झालेली असून दिल्लीतील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 1103 रुपये इतके आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना थोड्याफार प्रमाणात महागाईचा झटका व आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबरोबरच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रकमेमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसत आहे. प्रत्येक राज्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये थोडाफार फरक असतो. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कंपन्यांमार्फत LPG Rate Increase करण्यात आल्यास प्रत्येक राज्यामध्ये असणाऱ्या दरामध्ये थोडाफार फरक आपल्याला जाणून येतो.

 

देशातील प्रमुख शहरांतील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती:

1. मुंबई: 1102.50रु

2. दिल्ली: 1103 रु

3. चेन्नई: 1118.50 रु

4. कोलकाता: 1129 रु

 

देशातील प्रमुख शहरांतील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती:

1. मुंबई: 2071.50 रु

2. दिल्ली: 2119.50 रु

3. चेन्नई: 2268 रु

4. कोलकाता: 2221.50 रु

 

संपूर्ण देशभरात 19 किलोच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीच्या दरामध्ये 350.50 रुपयांची वाढ झालेली असून यामुळे मुंबई येथील 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही 2071.50 रु इतकी आहे.

रेशन कार्डधारकांना धान्य ऐवजी पैसे वाटप करण्याचा शासन निर्णय जाहीर; रेशन ऐवजी प्रत्येकी 9000 रु मिळवण्यासाठी अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा

 

यापूर्वी बदललेले गॅस सिलेंडरचे दर:

देशातील ऑइल मार्केटिंग कंपनीने वर्ष 2023 च्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा धक्का देऊन 2023 च्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली होती. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करता ऑइल मार्केटिंग कंपनी यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 25 रुपयांची वाढ केलेली होती. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास त्याचा परिणाम हॉटेल तसेच खाद्यपदार्थ विक्रेते व रेस्टॉरंट यांच्यावर होऊन महागाई मध्ये वाढ होते. तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होतो.

 

हे नक्की वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टी नुकसान भरपाई चे उर्वरित पैसे 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 

 

मागील वर्षी गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेले बदल

मागील वर्षी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये चार वेळा मोठ्या प्रमाणात बदल केले होते. गेल्या वर्षी चार वेळा गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली होती सुरुवातीला 50 रुपये त्यानंतर पुन्हा पन्नास रुपये आणि त्यानंतर 3 रुपये 50 पैसे आणि शेवटी 50 रुपयांची वाढ करण्यात आलेली होती. अशाप्रकारे गेल्यावर्षी ऑइल उत्पादक कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये चार वेळा वाढ केलेली होती.

Leave a Comment

error: Content is protected !!