शेतकरी बांधवांनो जमीन आणि संपत्ती म्हटलं की त्या ठिकाणी वाद आणि भांडणे ही काही नवीन गोष्ट नाही, त्यामुळे एखाद्या वेळेस अशी परिस्थिती तुमच्या निर्माण झाल्यास म्हणजेच एखादी व्यक्तीने तुमच्या जमिनीच्या मालकात्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यास खालील चार पुरावांच्या आधारे तुम्ही तुमची जमीन सिद्ध करू शकतात. जमीन सिद्ध करण्यासंदर्भातील हे चार पुरावे कोणते आहेत, या संदर्भात या लेखात आपण Land Ownership संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.
जमिनीच्या वादा संदर्भातील असे अनेक लाखो प्रकरणे आपल्या राज्यात पडून आहेत अनेक प्रकारचे प्रकरण न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे जमिनी संबंधित मुद्दा म्हटले की आपल्याला अनेक वेळा सतर्क राहण्याची आवश्यकता असते. आजच्या काळात जमीन प्रत्येकाला हवी असते त्यामुळे आपल्याला आपली जमीन land Record सांभाळून ठेवायला पाहिजे. जमिनीच्या मार्गातून सिद्ध करणारे हे चार पुरावे कोणते आहेत याची माहिती खालील प्रमाणे आहे.
जर तुम्हाला एखाद्या वेळेस Land Ownership हे सिद्ध करण्याची आवश्यकता भासल्यास तुम्ही खालील पुराव्यांच्या आधारे तुमची जमीन असल्याचे सिद्ध करू शकतात. राज्यामध्ये अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये जमीन स्वतःच्या नावावर असून सुद्धा जमीन कसणारा व्यक्ती दुसरा असतो. अनेक ठिकाणी एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे त्यामुळे अशा प्रसंगी तुम्हाला हे चार कागदपत्र महत्त्वाचे ठरू शकतात. जर तुम्हाला एखाद्या वेळेस जमिनीची मालकी सिद्ध करण्याची आवश्यकता भासल्यास तुमच्याकडे जमिनी संदर्भातील ही कागदपत्रे असणे आवश्यक असणार आहे.
जमिनी संदर्भातील 4 महत्त्वाचे पुरावे Importance Documents of land ownership
जमीन स्वतःचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी खालील चार महत्त्वाचे पुरावे आहेत.
1. खत औषध व बियाणे खरेदी केल्याची पावती:
जमीन खरेदी करत असताना किंवा एखाद्या वेळेस जमीन विकत असताना ती जमीन तुमच्याच मालकीची आहे म्हणजेच मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र म्हणजे खत औषध किंवा बियाणे खरेदी केल्याची पावती होय.
2. शेत जमिनीचा सातबारा 8अ:
शेतजमीन सिद्ध करण्यासंदर्भातील महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे आठ अ उतारा होय. प्रत्यक्ष जमिनीला वेगवेगळ्या क्रमांकाचे गट क्रमांक असतात तसेच जमिनीची सर्व माहिती 8अ मध्ये असते. त्यामुळे त्या शेतकऱ्याकडे सातबारा आणि आठ अ असणे आवश्यक आहे. शेत जमिनीचा आरसा म्हणजे सातबारा उतारा असतो. शेत जमीन कोणाच्या नावावर आहे हे सातबारा मध्ये लिहून असते त्यामुळे कोणत्याही कामाकरिता सातबारा तुम्हाला मागितला जातो त्यामुळे शेत जमिनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे सातबारा उतारा होय.
ज्यांच्याकडे शेत जमीन आहे तशा प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःच्या शेत जमिनीचा सातबारा उतारा असतोच.
3. जमीन महसूल पावत्या व पिक विमा पावत्या:
दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठी आपल्याला आपल्या जमिनीचा महसूल भरण्याची पावती देतो. त्याचप्रमाणे जमिनीशी संदर्भात इतर यापूर्वी केलेले कागदपत्र तसेच दाखले किंवा काही बदल हे देखील तुम्ही पुरावा म्हणून वापरू शकतात.
त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या शेत जमिनीचा पिक विमा काढत असाल तर पिक विम्याच्या पावत्या देखील शेत जमिनीच्या मालकी हक्क दर्शवणे संदर्भात महत्त्वाच्या पुरावा आहेत.
4. प्रॉपर्टी कार्ड
शेत जमिनीच्या प्रॉपर्टी कार्ड हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. केंद्र शासनाने प्रॉपर्टी कार्ड सुरू केलेले असून यामुळे तुमच्या सर्व मालमत्तेची माहिती असणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमची जमीन स्वतःची असल्याबद्दल सिद्धत्व दाखवू शकतात.
वरील चार महत्त्वाचे शेत जमिनीशी संदर्भात पुरावे आहेत ज्याच्या माध्यमातून जर तुम्हाला शेतजमीन तुमची आहे हे सिद्ध करण्याची आवश्यकता भासल्यास तुम्ही अगदी सहजतेने ते सिद्ध करू शकतात. यापैकी काही कागदपत्रे तुमच्याकडे असतील किंवा काही नसतीलही, वरील कागदपत्रांच्या माध्यमातून ती जमीन तुमची आहे हे सिद्ध होण्यास मदत होईल.