शेतकरी बांधवांना आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला जमीन तसेच पैसा व संपत्ती हवी आहे. आपण जे कोणतेही कार्य करतो ते पैसे कमवण्यासाठीच करतो. त्यामुळे आपल्या वडिलांच्या नावावर असणारी जमीन छोटीसी का असेना त्या जमिनीची वाटणी करण्यात येतेच. आपल्या भारत देशात जमिनीच्या वाटपा संदर्भात तसेच जमिनीच्या इतर व्यवहारात संदर्भात अनेक प्रकारचे कायदे आहेत, जे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात. अनेक वेळा जमिनीच्या वाटण्यावरून कुटुंबामध्ये वाद होताना दिसतात. अनेक वेळा वडील मुलांच्या परवानगीशिवाय त्यांची जमीन इतरांना विकतात. त्यामुळे आजच्या या लेखात आपण वडिलांना मुलाच्या परवानगीशिवाय जमीन विकता येते का Land Act Information याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
आपल्या देशात प्रत्येक समाजाकरिता वेगवेगळे जमिनीशी संबंधित कायदे आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचा देखील जमिनी संदर्भात महत्त्वाचा कायदा आहे. त्यामुळे या कायद्याच्या आधारे जमिनीच्या व्यवहारांवर अनेक प्रकारचे बंधने तसेच नियम आहेत. संपत्तीच्या वाटपामध्ये कायद्यामध्ये अनेक प्रकारच्या तरतुदी असून परिवारातील संपत्तीवर त्या परिवारातील सर्व सदस्यांचा समान अधिकार असतो. वडिलांची जमीन ही परंपरेनुसार त्यांच्या मुलांची होत असते. मुलांना वारसा हक्काने वडिलांची जमीन प्राप्त होत असते.
जमिनीच्या वाटणी मुळे अनेक वेळा वाद होतात
एखाद्या परिवारामध्ये जर एखाद्या वडिलाला तीन ते चार मुले असतील तर त्यातील एखादा मुलगा वडिलांकडे जमिनीच्या वाटणीचा आग्रह करतो. किंवा बऱ्याच वेळेस वडील त्यांच्या मुलांची परवानगी न घेता जमिनीची विक्री तसेच व्यवहार करतात त्यामुळे अनेक वेळा कुटुंबामध्ये वाद निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. किंवा वडील एखाद्या वेळेस त्यांच्या मृत्युपत्रांमध्ये एखाद्या मुलाला जमिनीशी संबंधित सर्व अधिकार देतात त्यामुळे देखील अनेक वेळा भांडण तंटे निर्माण होतात. त्यामुळे परिवारातील एखादा सदस्य थेट कोर्टामध्ये जाऊन दाद मागतो, त्यामुळे land act परिवारातील सदस्याचाच पैसा या गोष्टी करिता खर्च होत असतो.
वडिलोपार्जित जमीन वर मुलाचा असलेला अधिकार Child’s right to ancestral land
कायद्यानुसार तसेच परंपरेनुसार वडीलोपार्जित जमीन ही मुलाच्या नावावर होत असते. एखाद्या परिवारामध्ये नवीन मुलगा जन्म झाल्यानंतर जन्माच्या वेळीच वारस म्हणून ती जमीन सदर मुलाच्या नावावर होत असते. भारतातील असणाऱ्या जमीन कायद्यानुसार हा हक्क त्या मुलाला प्राप्त झालेला असतो. त्यामुळे वडिलांना प्राप्त झालेल्या वडिलोपार्जित जमिनीवर त्यांच्या मुलांचा संपूर्ण अधिकार असतो.
मुलाची परवानगी न घेता वडील जमीन विकू शकतात का?
जर तुमच्या आजोबांनी तुमच्या वडिलांना दिलेली जमीन व्हील म्हणून दिलेली असेल तर ती जमीन वडिलोपार्जित समजण्यात येते. आणि तुमच्या वडिलांना मिळालेली ती जमिनी जर आजोबांनी भेट म्हणून वडिलांना दिलेली असेल तर ती जमीन वडिलोपार्जित समजण्यात येत नाही. त्यामुळे अशा जमिनीच्या विक्री तसेच जमिनी संदर्भातील सर्व व्यवहार वडील मुलाची परवानगी न घेता करू शकतात. अशा जमिनीच्या विक्री करण्याला कायद्यानुसार वडिलांना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. आणि वडिलोपार्जित असणारी जमीन वडील मुलाच्या सहमतीने विकू शकतात.
जमीन विक्री करण्यासंदर्भातील मुलांचे हक्क तसेच वडिलांचे अधिकार हे आपण या लेखात जाणून घेतलेली आहे. जमिनीच्या वाटपा संदर्भातील ही माहिती महत्त्वाची असल्यामुळे इतरांना देखील नक्की शेअर करा.