या शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विम्याचे 244 कोटी रुपये वितरित; शासन निर्णय जाहीर; लगेच पहा पात्र शेतकऱ्यांची नावे | Kharip Pik Vima

शेतकरी मित्रानो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत खरीप पिक विमा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2022-2023 चा लाभ मिळवून देण्यासाठी 244 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत खरीप पिक विमा मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना तसेच ज्या शेतकऱ्यांना अत्यंत कमी पिक विमा मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. Kharip Pik Vima Maharashtra 244 कोटी निधी वितरणा संदर्भात माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

शेतकरी बांधवांनो राज्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झालेला होता. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ज्या शेतकऱ्यांनी Kharip Pik Vima 2022 काढलेला होता, अशा शेतकऱ्यांना pik vima कंपनीकडे दावा दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यामार्फत खरीप पिक विम्याची वाटप करण्यात आले होते.

 

परंतु बऱ्याच ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना अत्यंत अल्प प्रमाणात खरिपाच्या पीक विम्याचे वाटप केल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून प्राप्त झाली होती. तसेच अनेक भागात अजून पर्यंत खरिपाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांकडून वारंवार शासन दरबारी पिक विमा वाटपाची मागणी करण्यात येत होती. शेतकऱ्यांनी pik vima कंपन्यांना पिक विमा वितरित करण्याबाबत विचारणा केल्यास त्यांच्याकडून शासनाने अद्याप रक्कम वितरित केलेली नाही, असे सांगण्यात येत होते.

 

त्यामुळे अजून पर्यंत अनेक शेतकऱ्यांना Kharip Pik Vima 2023 मिळालेला नसल्यामुळे राज्य शासनाने 244 कोटी रुपये इतका निधी वितरित केलेला आहे. आता हा निधी पिक विमा कंपन्यांमार्फत लवकरच पिक विमा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

 

या शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विम्याचे 244 कोटी रुपये वितरित; शासन निर्णय जाहीर; लगेच पहा पात्र शेतकऱ्यांची नावे

 

अनेक शेतकरी पिक विमा च्या प्रतीक्षेत

राज्य शासनाकडून पिक विमा हप्ता मिळणे बाकी आहे, असे कारण देऊन अनेक शेतकऱ्यांना अजून पर्यंत पिक विम्याची वाटप करण्यात आलेले नाही. तसेच काही भागांमध्ये अतिशय कमी प्रमाणात अल्प पीक विम्याचे वाटप केलेले आहे. त्यामुळे असे अजूनही राज्यातील अनेक शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा पिक विम्याचा मिळालेला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता राज्य शासनाने वितरित केलेल्या 244 कोटी पिक विमा रकमेमधून पिक विमा मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

244 कोटी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय येथे पहा

 

244 कोटी पिक विमा साठी कोणते शेतकरी पात्र आहेत?

राज्यातील खरीप पिक विमाधारक शेतकरी या पिकासाठी पात्र असून ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा 2022 काढल्यानंतर त्यांच्या पिकांची नुकसान झालेले असताना 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने क्लीन केलेला आहे, असे शेतकरी 244 कोटी रुपये pik vima मिळण्यास पात्र ठरणार आहे.

244 कोटी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय येथे पहा

खरीप हंगाम 2021 22 करिता 78 लाख रुपये पिक विमा वाटपाचा शासन निर्णय येथे पहा

अशाप्रकारे आपण एक छोटीशी अपडेट pik vima निधी वितरण संदर्भात जाणून घेतलेली आहे. राज्य शासनाने नवीन निधी मंजूर केल्यामुळे पिक विमा पासून वंचित असणाऱ्या तसेच अजून पिक विमाना मिळालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या मार्फत पिक विमा वितरित करण्याची शक्यता आता वाढलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!