कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर! 300 रु प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान जाहीर | Kanda Anudan

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या अतिशय बिकट परिस्थिती सुरू आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला अतिशय कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनावरील खर्च तर निघत नाही परंतु शेतकऱ्यांनी कांदा विकण्यासाठी बाजार समितीमध्ये आणण्यासाठी जो वाहतूक खर्च केला होता तो सुद्धा कांदा विकून निघत नाही. त्यामुळे अनेक क्विंटल कांदा विकून सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात केवळ दोन चार रुपये पडत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. या Kanda Anudan निर्णय संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

 

सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पेटलेला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष तसेच अनेक सदस्यांच्या माध्यमातून कांद्याचा प्रश्न मांडण्यात आलेला होता. त्यानंतर राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 रुपये प्रति क्विंटल Kanda Sanugrah Anudan देण्यात येणार आहे.

 

 

विरोधकांनी उपस्थित केला होता कांद्याचा प्रश्न:

मित्रांनो कांद्याच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले. नाफेड द्वारे कांद्याची खरेदी सुरू असल्याचे माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर विरोधकांनी म्हटले की प्रत्यक्षात नाफेड द्वारे खरेदी सुरू नाही. तसेच महाराष्ट्राचा बजेट सादर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सानुग्रह अनुदान Onion Subsidy जाहीर केले आहे.

 

 

कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान मिळणार Kanda Anudan Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2016 व 17 मध्ये शंभर रुपये सानुग्रह अनुदान दिले होते त्यानंतर सन 2017 आणि 18 मध्ये दोनशे रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. परंतु वाढती महागाई व इतर सर्व गोष्टींचा खर्च लक्षात घेता तसेच कांद्यावरील उत्पादन खर्च लक्षात घेता यावर्षी सानुग्रह Onion Subsidy वाढवून ते 300 रुपये प्रति क्विंटल केलेले आहे.

 

त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सध्या कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडद्वारे खरेदीवर 10.5 रूपयापर्यंत भाव मिळत असल्याचे सांगितले आहे, त्याचबरोबर हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सानुग्रह अनुदान वाढवून तीनशे रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

नक्की वाचा: 8 क्विंटल 44 किलो कांदा विकून केवळ 1 रुपया मिळाला! 1 लाख रुपये खर्च केला आणि मिळाला फक्त 1 रुपया; कांद्याने पुन्हा रडवले

कांदा नाशिवंत त्यामुळे किमान आधारभूत किंमत लागू होत नाही:

शेतकरी बांधवांनो कांदा हे पीक नाशिवंत पीक आहे, म्हणजेच कांदा या पिकाला जास्त काळ आपण साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे तसेच आवक जास्त असल्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात कांद्याच्या किमती अतिशय कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

 

हे नक्की वाचा: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; नमो शेतकरी योजना सुरू; आता शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार ऐवजी 12 हजार मिळणार; तुम्हाला मिळणार का? ते पहा

 

या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत kanda Utpadak शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत लागू करता येत नसल्यामुळे सानुग्रह अनुदान 300 रुपये प्रति क्विंटल जाहीर केले आहे.

 

महत्वाचं अपडेट नक्की वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता केवळ 1 रुपया भरून पिक विमा काढता येणार; अर्थसंकल्पात तरतूद, महत्वाचा निर्णय

Leave a Comment

error: Content is protected !!