मित्रांनो संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येणाऱ्या हिंदू सणांपैकी होळी हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. होळी हा दोन दिवस साजरा करण्यात येणारा महत्त्वाचा सण असून. याला अनेक ठिकाणी रंगाचा सण सुद्धा म्हणतात. होळी या सणाला विविध नावाने ओळखले जात असून ग्रामीण भागामध्ये होळी हा सण शिमगा या नावाने प्रसिद्ध आहे. आजच्या लेखात आपण होळी सन 2023 संदर्भात विस्तृत माहिती, होळी सणाचा इतिहास तसेच होळी हा सण का साजरा केला जातो, होळी हा सण कसा साजरा केला जातो. होळी सण साजरा करणे मागचा इतिहास या Holi 2023 संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.
होळी या सणाला जगभरातील विविध लोकांद्वारे साजरा केले जाते. विविध जाती धर्माचे लोक सुद्धा होळी या सणाला मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करतात. Holi Festival च्या पहिल्या दिवशी होळीचे दहन करण्यात येते तर दुसऱ्या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग टाकून आनंदाने रंग खेळण्यात येतो. होळी हा दोन दिवसाचा सण असून पहिल्या दिवसाला ग्रामीण भागामध्ये शिमगा तर दुसऱ्या दिवसाला रंगपंचमी असे म्हणतात. या लेखात आपण Holi Mahiti Marathi जाणून घेत आहोत.
होळी सणा बद्दल मराठीत माहिती Holi Mahiti Marathi
होळी या सणाला festival of colors असे म्हटल्या जाते. कारण की होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी सर्वच ठिकाणी एकमेकांच्या अंगावर रंग उधळून रंग खेळण्यात येतो. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात व आनंदाने संपूर्ण भारत देशामध्ये हा होळीचा सण साजरा करण्यात येत असतो. खास करून शहरी भागात होळीच्या दुसऱ्या दिवशी संगीत तसेच नृत्य व मनोरंजनाची इतर कार्यक्रम तसेच रंग उधळण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
ज्याप्रमाणे शहरी भागामध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहात व सर्वत्र साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा या सणाला मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मध्ये सुद्धा Holi या सणाला मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात येते. भारतामध्ये सर्वच ठिकाणी होळी हा सण साजरा केला जातो. होळी सणाला वेगवेगळ्या नावाने देशभरात ओळखण्यात येते.
होळी या सणाची वेगवेगळी नावे कोणती आहेत?
होळी हा सण प्रामुख्याने Holi या नावाने ओळखला जातो. याशिवाय होळी या सणाला कामदहन तसेच हुताशनी उत्सव अशी वेगवेगळी नावे आहेत.
होळी हा सण किती देशात साजरा केला जातो?
होळी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सन असल्यामुळे खास करून भारत देशात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचबरोबर होळी हा सण भारताच्या शेजारील राज्य नेपाळ तसेच पाकिस्तान या देशांमध्ये देखील साजरा केला जातो. त्याचप्रमाणे विविध देशांमध्ये असणारे हिंदू धर्मातील व्यक्ती त्या देशांमध्ये आपला Holi San साजरा करतात.
होळी हा सण का साजरा केला जातो? Why is Holi celebrated?
होळी हा सण साजरा करण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे हिवाळ्याला निरोप देणे आणि उन्हाळा ऋतुचे स्वागत करणे. उन्हाळा हा ऋतू शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. शेतीशी संबंधित अनेक कामे उन्हाळ्यामध्ये करण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना करावयाच्या पेरणीची तयारी उन्हाळ्याच्या नागरणी पासून सुरू होत असते. तसेच वसंत ऋतू मधील रंगांचा आनंद घेण्यासाठी देखील हा सण साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये सर्व पाप तसेच दुष्कर्म नष्ट करून नवीन सुरुवात करण्यासाठी देखील हा Holi 2023 Information in Marathi साजरा केला जातो.
होळी सण साजरा करण्यामागचा इतिहास History of Holi Festival in Marathi
आपल्या हिंदू धर्म मध्ये आपण जेवढेही सण साजरे करतो तेवढा प्रत्येक सणांमध्ये तो सण साजरा करण्यामागे काही ना काही त्या सणाचा इतिहास असतोच. तसेच पौराणिक कथा सुद्धा असते होळी या सणाचा सुद्धा इतिहास आहे, ते Holi Mahiti Marathi खालील प्रमाणे आहे.
असे मानले जाते की फार वर्षांपूर्वी हिरण्यकशिपू नावाचा एक दुष्ट राजा होता. तसेच भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूची खूप मोठे भक्त होते. भक्त प्रल्हाद भगवान विष्णूची मन भवानी पूजा अर्चना करत होता. परंतु ते हिरण्यकशिपू ला आवडत असे. त्यामुळे त्या भक्त प्रल्हाद ला भगवान विष्णूची भक्ती न करू देण्यासाठी तसेच भगवान विष्णूंच्या भक्ती पासून त्याला दूर ठेवण्यासाठी त्याची जबाबदारी होलिका हिच्यावर सोपवली होती.
होलिका हिला अग्नीमध्ये न जळण्याचा वर प्राप्त झालेला होता. त्यामुळे ती अग्नीमध्ये जळू शकत नव्हती. त्यामुळे होलिका ने भक्त प्रल्हाद यांना मारण्यासाठी ती अग्नीमध्ये उभी राहिली. परंतु भक्त प्रल्हादाच्या भगवान विष्णू संदर्भातील अफाट भक्ती मुळे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. अग्नीपासून भक्त प्रल्हाद यांना काही झाले नाही. परंतु वर प्राप्त असलेल्या होलिकाला आगीपासून वाचता आले नाही तिची राख झाली. आणि तेव्हापासून संपूर्ण भारत देशात होळी हा सण साजरा केला जातो. अशी पौराणिक कथा Holi Festival या सणा निमित्त प्रसिद्ध आहे.
होळी सण कसा साजरा करतात? how to celebrate holi festival?
होळी हा दोन दिवसाचा असणारा भारतातील हिंदू धर्मातील प्रमुख महत्त्वाचा सण आहे. हा सण संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहात व आनंदाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. होळी या सणाच्या पहिल्या दिवशी होळीचे दहन करण्यात येते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शिमगा या दिवशी सर्वत्र एकमेकांना रंग लावण्याचा कार्यक्रम असतो. अनेक ठिकाणी सर्व गावांमध्ये एकत्रितरीत्या होळीचे दहन करण्यात येते. तर खेड्यापाड्यांमध्ये रंगपंचमी या सणाला अतिशय महत्त्व प्राप्त आहे. सर्व गावातील व्यक्ती तसेच नागरिक एकत्र येऊन एकमेकांना रंग लावत असतात.
होळी सणा निमित्त सर्वांनी खालील काळजी घ्या
Holi हा सण रंगांचा सण म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्यात येत असतो. त्यामुळे बाजारांमधील केमिकल युक्त रंग कोणीही वापरू नये. केमिकल मधील रंगामुळे त्वचेचे अनेक प्रकारची आजार तसेच रोग होतात तसेच तुमची स्किन खराब होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला रंग खेळायचा असेल तर तुम्ही कोरड्या रंगाचा वापर करू शकतात. होळीच्या सणानिमित्त अनेक ठिकाणी पदार्थांमध्ये भांग मिसळणी तसेच नशेचे पदार्थ मिसळणे हा प्रकार सुरू झालेला आहे त्यामुळे अशा पदार्थांपासून सावध रहा. होळीमध्ये खेळले जाणारे रंग डोळ्यामध्ये न जाईल याची काळजी घ्या. Holi information marathi संपूर्ण माहिती.
अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये होळी सन 2023 संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे. Holi Mahiti Marathi सर्वांना नक्की शेअर करा. तसेच तुम्हा सर्वांना होळी या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. हा लेख संपूर्ण वाचल्याबद्दल तुमचे आभार..