राज्यातील शेतकऱ्यांवर आस्मानी संकट! पुढील 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता; या ठिकाणी पडेल जोरदार पाऊस | Havaman Andaj Maharashtra

शेतकरी बांधवांना राज्यातील हरभरा आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी प्राप्त झालेली आहे. राज्यातील हवामान विभागाने पुढील तीन दिवस अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून शेतकऱ्यांचे पीक कापणीस येतानाच कापसाची एन्ट्री होणार असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाची दाट शक्यता वर्तवली असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे.

 

शेतकरी बांधवांनो सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा व गहू या पिकाची काढणी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना ज्यावेळेस हरभरा आणि गहू काढायचा येतो, त्यावेळेस पाऊस येतो आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतो तसेच शेतकऱ्यांना पळो की सलो करतो. हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या Havaman Andaj Maharashtra नुसार पुढील तीन दिवस राज्यांमध्ये पावसाचे असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची कापणी करताना अतिशय सावधपणे कापणी करायची आहे.

 

काय आहे हवामानाचा अंदाज

हवामान विभागांनी जाहीर केलेल्या नुकत्याच Havaman Andaj नुसार राज्यात मार्च ते मे महिन्यात कडाक्याची ऊन पडणार असून पुढील तीन दिवस राज्यातील तुरळक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये हरभरा आणि गहू हे पीक घेतलेले आहे, अशा शेतकऱ्यांनी ते पीक कापणीला सुरुवात केलेली असून शेतकऱ्यांनी या तीन दिवसाच्या अगोदर त्यांचे पीक काढून घ्यावे किंवा जर ते शक्य नसेल तर पुढील तीन दिवस कोणत्याही प्रकारच्या पिकाची कामे करू नये जेणेकरून तुम्ही कापणी केल्यानंतर जर तुमच्याकडे ते पीक झाकून ठेवण्याची व्यवस्था नसेल तर तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कडाक्याची ऊन पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून यावर्षी पाऊस सुद्धा निर्धारित वेळेच्या आधी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 

हवामान अंदाज नुसार राज्यात पाऊस केव्हा येणार?

नुकत्याच जाहीर झालेल्या Havaman Andaj नुसार तसेच काही हवामान विषयक तज्ञांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यात 4 ते 6 मार्च यादरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी पिकाची कापणी करणे टाळावे, असा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. नुकताच उन्हाळा सुरू झालेला असून आता ऊन पडण्यास सुरुवात झालेली आहे, आणि आता कडाक्याची ऊन टाकण्यापूर्वीच पावसाचा अंदाज तीन दिवस वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांवर याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होणार आहे.

 

महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस?

महाराष्ट्राच्या काही भागात चार ते सहा मार्ग दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचा परिणाम राज्यातील विदर्भ तसेच उत्तर कोकण आणि मराठवाड्याचा काही भाग व उत्तर महाराष्ट्र यांवर होणार आहे. तसेच राज्यातील सर्वच भागात 6 मार्च रोजी हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

 

घरकुल योजनेअंतर्गत 93 हजार 288 नवीन घरकुलांना मंजुरी; शासन निर्णय जाहीर; जाणून घ्या कुणाला मिळेल घरकुल 

विदर्भात या दिवशी पडेल पाऊस:

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिनांक 6 मार्च 2023 रोजी संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पाच ते सहा मार्च रोजी विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला व बुलढाणा तसेच यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे 58 कोटी रुपये जमा; आत्ताच यादीत आपले नाव पहा

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने सुद्धा तुरळक पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. अशाप्रकारे पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीशी संबंधित कामने लवकरात लवकर आटपून घ्यावी. तसेच या तारखे दरम्यान वातावरणामध्ये फरक दिसल्यास शेतकऱ्यांनी हरभरा किंवा गहू कापणी करू नये.

Leave a Comment

error: Content is protected !!