शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या पिकांची काढणी करण्याची वेळ जवळ आलेली असतानाच हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना मोठा अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील काही भागात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सावध होण्याची आवश्यकता असून या तीन दिवसांपूर्वी शेतीची सर्व कामे पूर्ण करून घ्यावीत. हवामान विभागाने वर्तवलेला Havaman Andaj बद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यात 4 मार्च 2023 ते 6 मार्च 2023 या कालावधीमध्ये तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. Maharashtra Havaman Andaj विभागाने वर्तवलेला हा अंदाज प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असायला पाहिजे. कारण की राज्यातील सर्वच भागांमध्ये सध्या हरभरा आणि गहू या पिकांची कापणी सुरू आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना जर ही गोष्ट माहीत नसली तर अचानक आलेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.
राज्यातील सर्वच भागात शेतकऱ्यांनी पिकवलेला हरभरा व गहू हे पीक कापणीस आलेले असून अनेक भागात शेतकऱ्यांनी हरभऱ्याची कापणी करण्यास सुरुवात देखील केलेली आहे. त्यामुळे हवामान विभागाने जाहीर केलेल्या Havaman Andaj शेतकरी बांधवांनी या तीन दिवसापूर्वी त्यांच्या शेतातील सर्व उर्वरित कामे पूर्ण करून घ्यायची आहे.
राज्यात कोणत्या भागात पडेल पाऊस
भारतीय हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या हवामानाचे अंदाजानुसार राज्यातील सर्वच भागात तुरळ ठिकाणी चार ते सहा या तारखे दरम्यान मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दर्शविण्यात आलेली आहे. परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाचा फटका विदर्भातील शेतकऱ्यांना जास्त होणार आहे. म्हणजेच येणाऱ्या या पावसाचा जोर विदर्भाकडे जास्त असणार आहे त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील विदर्भ तसेच मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भ उत्तर कोकण तसेच उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राज्यात केव्हा पडेल पाऊस?
राज्यातील सर्वच भागात चार ते सहा या तारखे दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून या तारखे दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये भाग बदलत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता Indian Meteorological Department ने वर्तवण्यात आलेली आहे.
विदर्भात या दिवशी बरसणार पाऊस
राज्यातील हवामान विभागाने खास करून विदर्भाकरिता दिनांक पाच ते दिनांक सहा या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून प्रामुख्याने विदर्भामध्ये पाच तारखेला तुरळ ठिकाणी पाऊस पडेल तर सहा तारखेला विदर्भाच्या सर्व भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट! जाणून घ्या रासायनिक खतांचे नवीन दर
अशाप्रकारे भारतीय हवामान विभागाने तसेच मुंबई वेधशाळेने राज्यातील हवामाना संदर्भात महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सावध होऊन शेतीची कामे पाऊस येण्याची अगोदर करून घ्यावी.