गाय गोठा साठी शासन 77 हजार रु अनुदान देत आहे; जाणून घ्या गाय गोठा साठी अनुदान कसे मिळवायचे; अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे | Gay Gotha Anudan Yojana

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वपूर्ण अशी योजना ही सुरू करण्यात आलेली होती. त्यामुळे या योजनेअंतर्गत गाय गोठ्याचे बांधकाम करण्यासाठी शासन 77 हजार रुपये अनुदान देणार आहे. या योजनेचे नाव शरद पवार ग्रामसमृद्धी योजना असे आहे. पूर्वी ही Gay Gotha Yojana मनरेगाच्या अंतर्गत राबविण्यात येत होती. परंतु आता या योजनेचे नाव बदललेले असून शेतकऱ्यांना शेळी पालन शेड बांधण्यासाठी तसेच गाय गोठा बांधण्यासाठी व कुक्कुट पालन शेड बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

मित्रांनो पशुपालन करणाऱ्या कोणत्याही पशुपालक शेतकऱ्यांना स्वखर्चाने जनावरांकरिता शेड बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे शासन अशा पशुपालक शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच जनावरे अस्तित्वात आहे, अशांना त्या जनावरांची सोय होण्यासाठी गोठा तसेच शेड बांधण्यासाठी अनुदान वितरित करीत असते. खास करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना राहण्यासाठी Gay Gotha उपलब्ध नसतो. परिणामी असे पशुपालक शेतकरी स्वखर्चाने गोठा बांधू शकत नसल्यामुळे त्याचा परिणाम जनावरांच्या उत्पादकतेवर तसेच जनावरांमधून मिळणारे उत्पन्नावर होतो.

 

गाय गोठ्यासाठी अनुदान देणारी योजना कोणती आहे? Gay Gotha Yojana Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महाविकास आघाडी सरकारने रोजगार हमी योजनेच्या या गाय गोठा योजनेमध्ये बदल करून नवीन प्रकारे शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू केलेली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना जनावरांचा गोठा बांधण्यासाठी त्यामध्ये प्रामुख्याने शेळी पालन शेड असेल तसेच कुक्कुटपालन शेड व गाय गोटा तसेच नाटक कंपोस्टिंग अशा चार महत्त्वाच्या योजनांचा समावेश करण्यात आला होता.

 

या योजनेअंतर्गत पशुपालकांना जनावरांच्या संख्येनुसार अनुदान मिळणार असून जर त्या शेतकऱ्याकडे निकषापेक्षा दुप्पट जनावरे असतील तर दुप्पट अनुदान मिळण्यास तो पात्र असेल. जर त्या पशुपालक शेतकऱ्याकडे तीन पट जनावरे असतील तर त्याला तीन पट अनुदान मिळणार आहे.

 

गाय गोठा साठी किती अनुदान मिळते?

शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत गाय गोठ्यासाठी 77 हजार रुपये इतके अनुदान मिळते. परंतु जर तुमच्याकडे असणाऱ्या गाईंची संख्या जास्त असेल तर तुम्ही दुप्पट आणि तीन पट अनुदान मिळवण्यास पात्र असतात.

 

या योजने अंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा? ते येथे पहा

 

मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर देश समृद्ध या तत्त्वावर चालणारी शेतकऱ्यांकरिता तसेच पशुपालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना सध्या सुरू असून या योजनेअंतर्गत नवीन अर्ज लवकरच स्वीकारण्यात येणार आहे.

 

गाय गोठा साठी 77 हजार रु अनुदान मिळविण्यासाठी अर्ज येथे करा

 

मित्रांनो या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतो. अर्जासोबत तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी लागेल. तसेच विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्जाचा नमुना देखील सोबत असावा लागेल.

 

योजनेचा अर्ज pdf येथे पहा

 

गाय गोठा योजने अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो?

मित्रांनो या शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत गाय गोठा या घटकाकरिता कोणत्याही पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्ज करता येते. परंतु त्यांच्याकडे ज्या जनावरांसाठी अर्ज करणार आहे ती जनावर असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही गाय गोठासाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे कमीत कमी 2 गायी असायला पाहिजे. योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी देखील अर्ज करू शकतात.

योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे जॉब कार्ड असणे आवश्यक असून अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मनरेगा योजनेचा लाभ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अर्ज करता येणार आहे. रोजगार हमी मनरेगाच्या निकषानुसार जे अर्जदार पात्र ठरतात तसे सर्व अर्जदार या योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!