महाराष्ट्र शासनाच्या महा ज्योती संस्थे मार्फत MHT-CET / JEE / NEET या परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोफत प्रशिक्षण आणि मोफत टॅबलेट मिळवण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करायचे असून या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अर्ज करण्याची थेट लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट मिळविण्यासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज सादर करा.
मोफत टॅबलेट मिळण्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख:
महाज्योती मार्फत वरील परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने 31 मार्च 2023 पूर्वी अर्ज सादर करायचा आहे. वरील तारखेनंतर अर्ज लिंक बंद झाल्यास तुम्हाला अर्ज करता येणार नाही, त्यामुळे 31 मार्चपूर्वी अर्ज करा.
योजनेअंतर्गत संपर्क कसा करायचा?
योजनेअंतर्गत केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार असून ईमेलद्वारे किंवा पोस्टाने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे योजनेची जाहिरात रद्द करणे किंवा विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देणे किंवा कोणत्याही प्रकारच्या बाबी करता सर्व अधिकार व्यवस्थापकीय महाज्योती संचालक यांच्याकडे असणार आहे.
संपर्क क्र. 0712-2870120/21
ईमेल आयडी- : mahajyotijeeneet24@gmail.com
फ्री टॅबलेट योजना असा करा अर्ज:
महा ज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या या फ्री टॅबलेट योजना अंतर्गत खालील लिंक वरून अर्ज करावा.
योजनेअंतर्गत लाभ मिळवून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील लिंक वरून अर्ज करू शकतात.