Crop Insurance Maharashtra: पिक विमा संदर्भात मोठी अपडेट! प्रलंबित पीक विम्याची तारीख फिक्स; या तारखेला येणार पिक विमा

शेतकरी बांधवांनो राज्यात अजूनही अनेक शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वारंवार शासन दरबारी तसेच पिक विमा कंपनीकडे त्यांचा हक्काचा पिक विमा जमा करण्याची मागणी केलेली होती. संपूर्ण राज्यात 2022 च्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमुळे फटका बसलेला असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात पीक न झाल्यामुळे तसेच नुकसानीमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे अजून पर्यंत pik vima न मिळालेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याची तारीख फिक्स करण्यात आलेली असून लवकरच त्यांना crop insurance मिळणार आहे.

 

शेतकरी बांधवांनो राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पिक विमा संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला असताना त्यावर अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलेले आहे. Pik Vima Yojana Maharashtra संदर्भात सर्व जिल्हाधिकारी तसेच पिक विमा कंपन्यांना निर्देश दिलेले असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे राज्यात एकही शेतकरी पिक विमा पासून वंचित राहणार नाही याची सुद्धा दक्षता घेण्यात असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

 

आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 2305 कोटी रुपये वाटप

शेतकरी बांधवांनो राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पिक विमा संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राज्यात 50 लाख शेतकऱ्यांना एकूण 2305 कोटी रुपयांची पिक विमा Nuksan Bharpai वितरित करण्यात आलेली असल्याची माहिती दिलेली आहे. तसेच अजूनही जर एखाद्या शेतकऱ्याला पिक विमा मिळालेल्या नसेल तर प्रलंबित पिक विमा देखील तात्काळ विक्री करण्यात येत आहे.

 

या तारखेला मिळणार प्रलंबित पिक विमा:

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून पर्यंत पात्र असून सुद्धा शेतकऱ्यांना Pik Vima मिळालेला नसेल किंवा कोणत्याही कारणामुळे त्यांच्या खात्यात पिक विमा जमा झालेल्या नसेल तर अशा शेतकऱ्यांना 31 मार्च 2023 पूर्वी पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कृषिमंत्र्यांनी ही माहिती दिलेली असून त्या संदर्भातील सर्व आदेश पीक विमा कंपन्यांना तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत.

 

त्याचबरोबर यापुढेही अब्दुल सत्तार म्हणाले की हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना या व्यतिरिक्त ही अतिरिक्त मदत हवी असल्यास ती सुद्धा उपलब्ध करून देण्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जे शेतकरी crop insurance पासून वंचित होते अशा शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे.

 

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 50000 अनुदान; नियमित कर्जमाफी 4थी यादी जाहीर; लगेच आपले नाव पहा

 

शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणे सुरू:

कृषिमंत्री यांनी केलेल्या घोषणेनुसार तसेच पीक विमा कंपन्यांना दिलेल्या आदेशानुसार आता पिक विमा कंपन्यांनी अजूनही ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांना Kharip Pik Vima जमा झाल्याचे मेसेज येत्या चार ते पाच दिवसांपासून येत आहेत. त्यामुळे अजूनही जर तुम्हाला मेसेज आला नसेल किंवा पिक विमा मिळालेला नसेल तर 31 मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांना हा पिक विमा मिळणार आहे.

महत्वाचं अपडेट नक्की वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला 32 कोटी रुपयांचा पिक विमा; फक्त हेच शेतकरी पात्र; यादी पहा

Leave a Comment

error: Content is protected !!