नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात येत असते. त्याकरिता शेतकरी बांधवांना पिक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागत असते. शेतकऱ्यांनी चालू आर्थिक वर्षाकरिता त्यांच्या पिकांचा पिक विमा काढल्यास ते त्या वर्षाच्या पिकांकरिता नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र असतात. पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई चा दावा दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान भरपाईची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाईची वितरण पिक विमा योजनेच्या माध्यमातून करण्यात येत असते. आजच्या लेखात आपण कोणत्या जिल्ह्याकरिता पिक विमा मंजूर झालेला आहे, या Crop Insurance संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर होऊन सुद्धा पिक विमा वाटप करण्यास अनेक वेळा टाळाटाळ करण्यात येते, परिणामी शेतकऱ्यांना पिक विमा मिळवण्यासाठी पिक विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये फेऱ्या मारावे लागतात तसेच कृषी अधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती करावी लागते. सन 2022 मध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झालेले असल्यामुळे राज्य शासनाने pik vima कंपन्यांना विमा वाटप करण्याचे निर्देश दिलेले होते, परिणामी शेतकऱ्यांना पिक विम्याची वाटप करण्यासाठी निधी मंजूर करण्यात येत आहे.
राज्य शासनाने सन 2022 च्या पीक विम्याची संपूर्ण राज्य हीष्याची असणारी रक्कम pik vima कंपन्यांना वितरित केलेली असल्यामुळे पिक विमा शेतकऱ्यांना वितरित करावाच लागणार आहे. पिक विमा कंपन्यांमार्फत यापूर्वीसुद्धा शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे परंतु अनेक शेतकरी अजूनही पात्र असून सुद्धा पीक विम्याचे प्रतीक्षेत आहेत. अशा शेतकऱ्यांना सुद्धा पंधरा दिवसाच्या आत म्हणजेच 31 मार्च पूर्वी पीक विम्याची रक्कम वाटप करण्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिक विमा मंजूर
खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, सोयाबीन व कापूस ही पिके पूर्णतः नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली होती. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर करून पीक विमा कंपन्यांना देखील पिक विमा वाटप करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा उतरवलेला होता, तसेच राज्यात ज्यावेळेस अतिवृष्टी व नुकसान भरपाई झालेली होती त्यावेळेस नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला होता, अशा शेतकऱ्यांना आता crop insurance मंजूर करण्यात आलेला आहे.
खालील जिल्ह्याला झाला पिक विमा मंजूर
राज्यातील वाशिम जिल्हा करिता हा kharip pik vima मंजूर झालेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सन 2022 च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी crop insurance कंपनीकडे नुकसान भरपाई क्लेम केलेला होता, अश्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे.
किती पीक विमा झाला मंजूर?
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत kharip pik vima योजना 2022 खरीप हंगाम नुकसान भरपाई करिता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 32 कोटी 71 लाख 77 हजार 922 रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात जवळपास 22 हजार शेतकऱ्यांना 32 कोटी पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना हा विमा मंजूर झालेला आहे.
नियमित कर्ज माफी सर्व जिल्ह्यांची नवीन 4थी यादी जाहीर; 50000 अनुदान चौथी यादी डाऊनलोड करा लगेच