शेतकरी बांधवांनो सध्या अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून आहे. अनेक शेतकरी कापसाचे बाजार भाव दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे त्यांच्या घरात साठवून ठेवलेला कापूस विकत आहेत. यावर्षी गेल्यावर्षी येत नाहीत शेतकऱ्यांनी कापसाची लागवड जास्त केलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना हवा असलेला बाजार भाव सध्या तरी मिळत नाही आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारभावात कापसाचा दर काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला मागणी आहे का? आणि कापसाचे बाजार भाव केव्हा वाढणार या Cotton Rate संदर्भात महत्त्वाचे विश्लेषण आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
शेतकरी बांधवांनो सध्या Kapus Bajarbhav दबावात आहे. गेल्या आठवड्यापासून cotton market price मध्ये खूप मोठ्या प्रमाणात नरमाई पाहायला मिळाली. अनेक शेतकरी कापसाच्या बाजारभावामुळे तसेच कापसाच्या बाजारभावात होणाऱ्या वारंवार घट मुळे संभ्रमात पडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता त्यांच्या घरातील असलेला कापूस बाजारात विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केल्यामुळे बाजार समितीमध्ये कापसाची दररोजची आवक वाढली आहे. आज एक लाख पन्नास हजार गाठी कापसाची आवक झालेली होती. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाची आवक पाहायला मिळाली.
बाजार समितीतील कापसाची आवक वाढली
शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी महिना संपलेला असून मार्च महिना सुरू झालेला आहे. खरीप हंगाम केव्हाच संपून रब्बी हंगाम सुरू होऊन रब्बी हंगामाची देखील पीक निघत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस साठवून आहे, अशा शेतकऱ्यांना दिवसेंदिवस कापसाच्या बाजार भावाची चिंता लागत आहे. देशातील आजच्या cotton market rate चा आजचा विचार करता आज कापसाचे बाजार भाव स्थिर होते. राज्यातील काही बाजार समितीमध्ये शंभर ते दोनशे रुपयां चा चढ-उतार भावामध्ये आढळून आला. परंतु आता गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात जास्त प्रमाणात शेतकरी कापूस विक्री करत असल्याचे आढळून आलेले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ काहीच लोकांनी यावर्षी लवकर कापूस विकलेला आहे. अनेक शेतकरी अजूनही कापसाच्या दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये दैनंदिन Kapus आवक एक लाख पन्नास हजार गाठीच्या दरम्यान होती. फेब्रुवारी महिन्याकरिता व्यापाऱ्यांनी दोन लाख गाठी आवक राहील असा अंदाज वर्तवला होता. परंतु गेल्या महिन्यात सुद्धा दैनंदिन आवक कमी पाहायला मिळाली.
सध्या महाराष्ट्रातील बाजार समितीतील कापूस आवकचा विचार करता ती 1,50,000 गाठी च्या आसपास आहे. परंतु व्यापाऱ्यांनी या महिन्याच्या शेवटपर्यंत कापसाची आवक वाढण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.
आज दिवसभरात किती मिळाला कापसाला दर?
कापसाच्या बाजार भावाचा आजचा विचार करता आज कापसाच्या बाजार भावाची दैनंदिन आवक ही 1,50,000 गाठीं च्या दरम्यान होती. तसेच आज दिवसभरात विविध बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी 7600 ते जास्तीत जास्त 8000 रुपये इतका दर मिळालेला आहे. तसेच कापूस बाजारभावांच्या वायद्याचा विचार करता त्यामध्ये देखील थोडाफार प्रमाणात सुधारणा झालेली दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजार आणि वायद्यांमध्ये असणारे कापसाचे दर:
सध्या राज्यातील कापसाचे बाजार भाव हे दबावात असेल तरी सुद्धा वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत कापूस बाजार भावाच्या मार्केटवर सकारात्मक स्थिती निर्माण होत आहे. जून महिन्यातील वायदे 280 रुपयांनी वाढून 63 हजार 920 रुपयांवर पोहोचले होते. तसेच एप्रिल महिन्यातील वायदे 140 रुपयांनी वाढवून ते 63520 रुपयांवर पोहोचले होते. परंतु कापसाच्या प्रत्यक्ष खरेदीचे दर थोड्याफार प्रमाणात नरमलेले होते. वायदे सायंकाळ पर्यंत 86 सेंट प्रति पाउंड वर होते तर कॉटलूक ए इंडेक्स 98.60 सेंट प्रतिपाउण्डच्या दरम्यान होता. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार होताना दिसत आहे.
कापसाच्या दरवाढीबाबत तज्ञांचे मत:
तज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजार भाव मध्ये होत आहे तरीसुद्धा इथून पुढे कापसाची मागणी वाढणार आहे. तसेच अमेरिका ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कापसाला चांगला उठाव मिळेल त्यामुळे जास्त काळ कापसाचे भाव दबून राहणार नाही. देशातून कापसाची निर्यात सुरू असून चीन देश कापसाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास इच्छुक आहे. त्यामुळे तज्ञांच्या मते कापसाच्या बाजार भाव मध्ये त्या काळात सुधारणा होण्याची शक्यता असून कापसाचे दर 8500 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कापसाला सरासरी आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत दर महिन्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
देशातील कापूस दरवाढीसाठी पोषक स्थिती आहे, तरीसुद्धा कापसाचे बाजार भाव दबावात का? जाणून घ्या कारण