Cotton Market Rate Maharashtra: कापूस उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; कापूस दर हंगामातील निचांकी पातळीवर; कमी कापूस दरामुळे शेतकरी नाराज!

शेतकरी बांधवांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस नाराजी पसरत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना कापसाच्या दरामध्ये चांगली सुधारणा होऊन चांगली वाढ होऊन चांगले दर मिळतील अशी प्रचंड अपेक्षा होती. परंतु आता दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे अपेक्षा भंग होताना दिसत आहे. कापूस मार्च महिन्याच्या या कालावधीत सर्वात कमी दरावर पोहोचला आहे म्हणजेच कापसाने निचांकी पातळी गाठली आहे. कापसाच्या या हंगामातील सर्वात कमी दर Cotton Market Rate आता कापसाला मिळालेला आहे. त्यामुळे कापसाच्या दराने त्याचा ऑल टाईम लो गाठलेला असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण दिसून येत.

 

शेतकऱ्यांना सध्या मार्च महिना सुरू आहे आणि या महिन्यांमध्ये अचानक शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस विक्रीसाठी आणल्यामुळे आवक वाढलेली आहे, परिणामी सरकी आणि पेंढेवर दबाव आल्यामुळे कापसाच्या भावात घट दिसून येत आहे. शेतकऱ्यांना कापसाची अवस्था अत्यंत बिकट झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांना जर सध्या चालू असलेल्या बाजारभावामध्ये cotton विकायची आवश्यकता भासली तर शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या खर्चामधून कापूस विक्रीतून मिळालेले पैसे वजा केल्यास शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही.

 

मित्रांनो मार्च महिना उजाडलेला असून मार्च महिना अर्धा संपलेला सुद्धा आहे. परंतु कापसाच्या भावात अजून देखील सुधारणा झालेली नाही परंतु पूर्वीच्या तुलनेत कापसाचे भाव फार कमी झालेले आहे. अनेक कापूस उत्पादक तज्ञांनी Kapus Bajarbhav साठी मार्च महिना महत्त्वाचा असल्याचे यापूर्वीच भाकीत केले होते. त्यामुळे मार्च महिना कापसाच्या बाजारभावातील पुढील दिशा ठरवेल का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या मध्यंतरी कापसाचे अत्यंत भाव कमी झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे.

 

कापसाची आवक वाढली

शेतकरी बांधवांनो मार्च महिना उजाडला असताना सुद्धा अजूनही कापसाच्या भावात वाढ झालेली नाही परंतु भाव कमी झालेले असल्यामुळे ते अजून कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटत आहे त्यामुळे अनेक शेतकरी त्यांचा Cotton Market Rate मध्ये विक्री करण्याकरिता आणत आहे. त्यामुळे या मार्च महिन्यात कापूस आवक वाढलेली दिसून येत आहे. या कापसाचे आवकीचा परिणाम Cotton Bajarbhav वर दिसून येत आहे. त्यामुळे कापसाची आवक वाढल्यामुळे सध्या कापूस भाव यावर्षीच्या हंगामातील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. तसेच मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत अजूनही आवक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असल्यामुळे Cotton Rate आणखीन कमी होऊ शकतात.

 

परंतु एप्रिल महिन्यापासून आवक कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून भावामध्ये सुद्धा सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 

कापूस दर हंगामातील निचांकी पातळीवर

कापसाची आवक वाढल्यामुळे सध्या कापसाचे भाव दबावत आहे. राज्यातील अनेक बाजारपेठे मध्ये कापूस हा किमान 7 हजार रुपयांवर पोहोचलेला आहे. राज्यातील सर्व बाजारपेठेचा सरासरी जास्तीत जास्त कापूस बाजार भाव लक्षात घेता तो सात हजार आठशे रुपये इतका आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये 8 हजार ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत असणारा हा भाव आता सात हजार रुपये कमीत कमी पर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे कापसाने या हंगामातील सर्वात कमी दर म्हणजेच निचांकी पातळी गाठली आहे.

 

कापसाच्या बाजारभावाचा विचार करता डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये कापसाचे बाजार भाव टिकून होते. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये कापसाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन आता सध्या तो निचांकी पातळीवर पोहोचला आहे.

हे नक्की वाचा: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कापसाच्या बाजारभावात होणार मोठी वाढ; दरवाढीची कारणे आलेत समोर; संपूर्ण माहिती पहा

सध्या काय मिळतोय कापसाला दर? What is the current price for cotton?

सध्या महाराष्ट्र राज्यातील कापसाच्या बाजार भावाचा विचार करता 7 हजार 100 रुपयांपासून कापसाचे दर सुरू होत असून जास्तीत जास्त 7700 रुपये इतका दर कापसाला मिळत आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचे देणे तसेच इतर आर्थिक कारणांमुळे कापूस विकण्याची आवश्यकता पडू शकते त्यामुळे कापसाच्या बाजारभावातील अचानक आवक आणखीन वाढल्यास कापसाच्या बाजार भाव त्याचा फटका बसू शकतो. परंतु तज्ञांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यामध्ये कापसाचे बाजार भाव आहे 8 हजार 500 रुपये पर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 

महत्वाचं अपडेट नक्की वाचा: आंतरराष्ट्रीय बाजारात किती मिळतोय कापसाला भाव? कापसाचे अच्छे दिन केव्हा येणार! कापुस बाजारभाव विश्लेषण

Leave a Comment

error: Content is protected !!