मित्रांनो राज्यात जास्तीत जास्त शेतकरी कापूस या नगदी पिकाचे उत्पादन घेतात. राज्यात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकांपैकी कापूस हे एक महत्त्वाचं नगदी पीक आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस जास्तीत जास्त शेतकरी पांढऱ्या सोन्याची लागवड करत आहे. गेल्या वर्षी कापसाला इतर सर्व पिकांपेक्षा चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस या नगदी पिकाला जास्त प्राधान्य दिले होते. अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांचे प्रमाण कमी करून कापसाची लागवड जास्त केलेली आहे. तसेच कापूस हे पीक महाराष्ट्र राज्यात जास्त करून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जाते.
महाराष्ट्र राज्यातील उर्वरित इतरही शेतकरी सोयाबीन या पिकाची कापसाला जास्त प्राधान्य देत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कापसाला गेल्यावर्षी मिळालेला चांगला बाजार भाव होय. परंतु या हंगामामध्ये कापूस या पिकाला फारसा चांगला भाव मिळताना दिसत नाही आहे. गेल्या वर्षी असलेल्या कापूस बाजार भावाचा विचार करता गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाला जवळपास दहा हजारापेक्षा जास्त Cotton Market Rate मिळत होता. परंतु कापूस बाजारभावाचे चित्र यावर्षी पलटले आहे.
आता फेब्रुवारी महिना संपत आहे. परंतु कापसाला पाहिजे त्या प्रमाणात चांगला दर मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात अजून किती काळ Cotton आपल्या घरात साठवून ठेवायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला कापसाचे बाजार भाव कमी असतानाच कापूस विकलेला होता. परंतु अचानक कापसाचे भाव वाढून गेल्यावर्षी जास्तीत जास्त 14 हजार रुपये प्रति क्विंटल इतका झाल्याने यावर्षी सुद्धा तेवढा भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना अजून सुद्धा आहे.
शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस साठवून!
मित्रांनो कापसाचे बाजार भाव वाढतील या अपेक्षेने अजूनही राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्यांच्या घरात साठवून ठेवलेला कापूस विकलेला नाही. परंतु शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवण्यास बाजार भाव वाढतील! असे सध्या तरी पाहायला मिळत नाही परंतु जाणकारांच्या मते लवकरच कापसाला चांगले दिवस येणार आहे.
शेतकऱ्यांनी जास्त वेळ त्यांच्या घरात कापूस साठवून ठेवल्यामुळे कापसावर वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. कापसामध्ये तयार झालेल्या किटकामुळे तसेच त्यांच्या चाव्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर खाज सुटणे तसेच अंगावर पुरळ सुटणे अशा घटना घडत आहे.
कापसाची दरवाढ होणार? Will the price of cotton increase?
शेतकरी मित्रांनो जाणकारांच्या मते कापसाच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून कापसाची पॅनिक सेलिंग न करण्याचा सल्ला जाणकारांनी दिलेला आहे. प्रत्येक तज्ञांकडून कापसाच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनेक कापूस तज्ञांच्या मते गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कापसाच्या दरात किंचित सुधारणा झालेली असून दबावात असलेले दर आता सुधारताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस बाजार भाव चा विचार करतात आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये कापुस बाजार भाव तेजीत आहे. तज्ञांच्या मते कापसाचे बाजार भाव आहे 8500 ते 9500 या दरम्यान भारतात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
या कारणांमुळे कापसाची दरवाढ होऊ शकते?
मित्रांनो अनेक दिवसांपासून कापसाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात चढउतार होताना दिसत आहे. परंतु अजूनही राज्यातील कोणत्याच बाजार समितीमध्ये कापसाचे बाजार भाव 9000 पेक्षा जास्त झालेले नाहीत. परंतु कापसाच्या बाजारभावाच्या वाढी संदर्भात काही बाबींचा विचार करता पोषक वातावरण निर्माण झालेल्या असून खालील काही कारणांमुळे cotton Market Rate increase होऊ शकते.
कापूस दरवाढ होण्याच्या बाबतीत महत्त्वाची बाब म्हणजे बांगलादेश या देशाकडून भारतीय कापसाची मागणी वाढवण्यात आलेली आहे. आपण भारतातून बांगलादेशला जो कापूस निर्यात करतो त्या भारतातील कापूस निर्यातीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चीन या देशाकडून सुद्धा भारत देशातील कापूस आयात करण्याची शक्यता तसेच तयारी दिसत आहे.
भारतातील कापूस आयात करण्यासाठी चीन या देशाने हालचाली सुरू केलेले आहे. याचा परिणाम या आठवड्यातील कापूस बाजारभावावर पडलेला आहे. सुरुवातीला 8000 पेक्षा कमी असणारे कापसाचे दर या आठवड्यामध्ये 8500 रुपये पर्यंत पोहोचले होते.
बांधकाम कामगार पेट्या वाटप सुरू; बांधकाम कामगार सेफ्टी किट मिळवण्यासाठी असा करा अर्ज
तज्ञांच्या मते कापसाला किती भाव मिळेल
मित्रांनो तज्ञांच्या मते कापूस या नगदी पिकाला येत्या काही दिवसांमध्ये 8500 ते 9500 या दरम्यान दर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच येत्या काही दिवसांमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु पुढील महिना हा मार्च महिना आहे त्यामुळे मार्च एंडिंगच्या काळात कापसाचे बाजार भाव वाढल्यास शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी असेल. तसेच मार्च महिन्यामध्ये कापूस या नगदी पिकाचे भवितव्य ठरणार आहे.