कोलगेट स्कॉलरशिप 2023 अंतर्गत अर्ज सुरू; 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार ! लगेच अर्ज करा | Colgate Scholarship 2023 Apply Online

विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी कोलगेट कंपनीच्या मार्फत कीप इंडिया स्मायलींग फाउंडेशन स्कॉलरशिप आणि मेंटॉरशिप प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप राबविण्यात येत असते. यावर्षी सुद्धा दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोलगेट मार्फत 50 हजार रुपये स्कॉलरशिप देण्यात येत असून त्याकरिता अर्ज सुरू झालेले आहेत. Colgate Scholarship 2023 अंतर्गत अर्ज कसा करायचा? त्याकरिता असणारी आवश्यक पात्रता तसेच इतर सर्व तपशील आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

कोलगेट इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने पाठपुरावा व्हावा यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी प्रयत्न करण्यात येत असते. Colgate कंपनीच्या मार्फत यावर्षी सुद्धा कोलगेट स्कॉलरशिप 2023 राबविण्यात येत असून याकरिता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप वितरित करण्यात येत आहे. जे विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या गुणवान आहेत तसेच हुशार आहेत, परंतु आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता येणे शक्य व्हावे चांगल्या ठिकाणी शिकायला मिळावे व त्यांचे उज्वल भविष्य व्हावे यासाठी Colgate Scholarship Program सुरू करण्यात आलेला आहे.

 

कोलगेट स्कॉलरशिप करिता पात्रता Eligibility for Colgate Scholarship

कोलगेट कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ही महत्त्वपूर्ण अशी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असणारी स्कॉलरशिप राबविण्यात येत असून याकरिता काही पात्रता ठरवून देण्यात आलेले आहेत त्या खालील प्रमाणे आहे.

1. अर्जदाराला 2022 च्या 10 मधील बोर्डाच्या परीक्षेत किमान 75 टक्के गुण असायला पाहिजे.

2. अर्जदाराला 2022 च्या 12 मधील बोर्डाच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण असायला पाहिजे.

3. त्याचप्रमाणे तो विद्यार्थी तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम किंवा चार वर्षाचा व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये अर्ज करण्यास पात्र असायला हवा.

4. अर्जदाराचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे पाच लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे.

 

 

किती रुपये स्कॉलरशिप मिळणार

कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत अर्जदारांना शिक्षण स्तरानुसार स्कॉलरशिप देण्यात येते. जसे की अर्जदारांनी चार वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असेल तर त्याला दरवर्षी 50 हजार रुपये पर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते.

Colgate Scholarship अंतर्गत 50 हजार रुपये स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया येथे पहा

 

अर्ज कसा करायचा व अंतिम तारीख:

Colgate Scholarship अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2023 आहे. जर तुम्ही सुद्धा दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला वरील प्रमाणे परीक्षेमध्ये सुद्धा मार्क मिळालेले असेल आणि तुमची प्रवेश पुढील शैक्षणिक वर्षाकरिता घेतलेला असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पन्नास हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळवू शकतात.

 

कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!