शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी बांधवांना यापूर्वी कुळ कायद्यानुसार किंवा कोणत्याही ना कोणत्याही कारणामुळे शासनाकडून जमिनी प्राप्त झालेल्या आहेत. ज्या नागरिकांना शासनाकडून जमिनी प्राप्त झालेल्या आहेत त्या जमिनी भोगवटदार क्रमांक 2 असतात. या भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी शेतकरी बांधवांना शासकीय परवानगी शिवाय विकता येत नाही. त्यामुळे भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केल्यास त्या जमिनीवर शेतकऱ्यांचा शंभर टक्के मालकी हक्क प्राप्त होत असून शेतकऱ्यांना त्या जमिनी संबंधित कोणत्याही प्रकारची व्यवहार करता येतात.
जर तुमची जमीन Bhogvatdar Varg 2 Jamin Convert To Bhogvatdar Varg 1 रुपांतरीत केल्यास तुम्हाला ती जमीन कोणत्याही प्रकारची पूर्वस परवानगी न घेता विकता येते तसेच कोणत्याही प्रकारच्या जमिनी संबंधित व्यवहारा करिता तुम्हाला शासनाची परवानगी घेण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ज्या जमिनी भोगवटदार वर्ग 2 आहेत त्या जमीन वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
भोगवटदार वर्ग 2 जमीन म्हणजे काय?
मित्रांनो जमिनीच्या वर्गवारीनुसार दोन प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार म्हणजे भोगवटदार वर्ग 1 जमीन आणि दुसरा प्रकार म्हणजे भोगवटदार वर्ग 2 जमीन होय. ज्या शेतकऱ्यांकडे भोगवटदार वर्ग 1 जमीन असतात. त्या शेतकऱ्याला त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या व्यवहार करताना किंवा ती जमीन विकताना कुणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसते. ती जमीन संपूर्णतः शेतकऱ्याच्या मालकीची असते. सहसा ही जमीन शेतकऱ्यांनी स्वतः विकत घेतलेली असते किंवा वडिलोपार्जित मिळालेली असते.
ज्या शेतकऱ्यांकडे भोगवटदार वर्ग 2 जमिनी असतात, त्या शेतकऱ्यांनी ती जमीन स्वतः विकत घेतलेली नसते. ती जमीन शासनाद्वारे प्राप्त असते किंवा कोणत्याही कायद्याद्वारे प्राप्त असते. त्यामुळे या जमिनीशी संबंधित महत्त्वाची व्यवहार जसे की जमीन विकणे किंवा जमिनीच्या वाटप करणे इत्यादी अधिकार शेतकऱ्यांना असल्यामुळे हे काम करण्यासाठी त्याला पूर्वपरवानगी घ्यावी लागते.
भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 कश्या करायच्या?
मित्रांनो महाराष्ट्र शासनाने भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 करण्यासाठी नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली असून आता शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असणारी Bhogvatdar Varg 2 Jamin ही Bhogvatdar Varg 1 करता येते. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून राज्यातील शेतकऱ्यांकडे असणाऱ्या वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्यास मान्यता दिलेली असून त्याकरिता शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी मोहीम देखील राबविण्यात येत असतात. भोकरदार वर्ग दोनची जमीन वर्ग 1 करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो.
भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 करण्यासाठी येणारा खर्च
शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार तुम्हाला जर तुमच्याकडे असणारी भोगवटदार वर्ग 2 जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये करायची असेल तर तुम्हाला त्या जमिनीच्या शासकीय किमतीनुसार 50% इतकी रक्कम शासनाकडे नजरांना म्हणून जमा करावी लागते.
भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 करण्यासाठी करावयाचा अर्ज pdf येथे पहा
मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पाच जुलै 2022 रोजी महत्त्वपूर्ण असा एक शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक करण्यासाठी तसेच निर्णयानुसार नजरांना भरण्यासाठी तीन वर्षाचा वेळ दिलेला होता परंतु आता याची मुदत वाढवून ती 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे.
भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे येथे पहा
त्यामुळे शेतकऱ्यांना जर त्यांची जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करायचे असेल तर अशा शेतकऱ्यांना विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागतो. तसेच शेतकऱ्यांना नजरांना म्हणून रक्कम देखील जमा करावी लागेल.
महाराष्ट्र शासनाने भोगतदार वर्ग दोनच्या जमीन मालकांना त्यांची जमीन वर्ग एक करण्यासाठी शासन निर्णय नुसार मान्यता दिलेली असून त्याकरिता शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये अर्ज करायचा असतो. त्याचप्रमाणे शासन देखील वेळोवेळी विविध मोहीम राबवून शेतकऱ्यांना याबाबत सखोल अशी माहिती देऊन शेतकऱ्यांच्या वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करून देत असते.