मित्रांनो महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता विविध प्रकारच्या 24 कल्याणकारी योजनांचा समावेश करून बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येत असतो. बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी बांधकाम कामगारांना पेट्या म्हणजेच सेफ्टी किट वाटप करणारी महत्त्वाची योजना ही बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून सध्या राबविण्यात येत आहे. त्यामुळे पेट्या Bandhkam Kamgar Safety Kit मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा? तसेच अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये उपलब्ध करून देणार आहोत.
राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. त्यापैकी बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी Bandhkam Kamgar Safety Kit योजना होय. बांधकाम कामगारांना काम करत असताना अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागते. बांधकाम हे एक अतिशय कष्टाचे आणि कठीण काम असून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात धोका असतो.
बांधकाम कामगार पेटीत कोणत्या वस्तू असतात?
त्यामुळे बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधकाम कामगारांना सुरक्षा किट पुरविण्यात येत असतात. यामध्ये बांधकाम कामगार काम करत असताना त्यांना आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश असतो. त्यामध्ये प्रामुख्याने
1. सेफ्टी हेल्मेट
2. टॉर्च
3. काम करताना आवश्यक असणारी बूट
4. जॅकेट
5. बॅग
6. सेफ्टी बेल्ट
7. चटई
8. बांधकाम कामगारांना राहण्यासाठी रात्री मच्छरांचा त्रास होऊ नये म्हणून मच्छरदाणी
9. टिफीन डब्बा
अशा अनेक प्रकारच्या वस्तू बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार पेट्या म्हणजेच सेफ्टी किट मार्फत वितरित करण्यात येत असतात.
बांधकाम कामगार पेटी कुणाला मिळेल?
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम विभागाच्या मार्फत वितरित करण्यात येणाऱ्या या बांधकाम कामगार सुरक्षा संच म्हणजेच बांधकाम कामगार पेट्या या केवळ नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांनाच वितरित करण्यात येत असतात. ज्या कामगारांनी बांधकाम विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली असते. व त्यांच्याकडे बांधकाम कामगाराची पुस्तक असते अशाच नोंदणीकृत कामगारांना या बांधकाम कामगार पेट्या वितरित करण्यात येत असतात.
बांधकाम कामगार पेटी कशी मिळवायची? How to get Bandhkaam Kamgar Safety Kit?
मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा बांधकाम कामगार सुरक्षा पेटी मिळवायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल. महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून अर्ज करा. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सुरक्षा संच मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल.
वरील लिंक वरून तुम्ही बांधकाम कामगाराच्या मार्फत वितरित करण्यात येणाऱ्या सुरक्षा पेट्या मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची?
मित्रांनो बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना या बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विमा तसेच घरकुल कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत तसेच शिक्षणासाठी मदत अशा अनेक योजनांचा समावेश आहे.
त्यामुळे जर तुम्हाला वरील योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात.